शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख फरार होतील, केतकी चितळेची हस्तक्षेप याचिका; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 21:18 IST

जर देशमुख फरार झाले तर महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि इडी यांच्याशी त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासंबंधी कसलेही सहकार्य करणार नाहीत असं केतकी चितळेंने म्हटलं आहे.

ठाणे: अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या वकीलामार्फतीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. देशमुख हे फरार होण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देण्यात येऊ नये, असे तिने या याचिकेमध्ये म्हटले आहे. दरम्यान, केतकी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोमवारी करण्यात आली आहे.

केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी हस्तक्षेप याचिकेमध्ये म्हटले आहे की, राज्यसभेसाठी मतदान करता यावे, म्हणून एका दिवसाचा जामीन अनिल देशमुख यांनी मागितला आहे. जर देशमुख फरार झाले तर महाराष्ट्र पोलीस सीबीआय आणि इडी यांच्याशी त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यासंबंधी कसलेही सहकार्य करणार नाहीत. ‘अनिल देशमुख मिळून येत नाहीत’ असा अहवाल सादर केला जाऊ शकतो. महाराष्ट्र पोलिसांनी असे केल्यास सीबीआय किंवा ईडी यांच्या ताब्यात देशमुख कधीही येणार नाहीत. त्यामुळेच देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती करणारा अर्ज देशपांडे आणि घनश्याम उपाध्याय या वकीलांनी विशेष न्यायालयात सादर केला आहे.

मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा का नाही?वकील देशपांडे यांनी केतकीच्या वतीने राज्यपाल डॉ. भगतसिंग कोश्यारी यांनाही एक पत्र दिले आहे. फेसबुकवरील एका पोस्टवरुन राज्यभरातील २२ पोलीस ठाण्यांमध्ये केतकीविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या सर्व प्रकरणातील तक्रारदार एका बलाढ्य राजकारण्याचे समर्थक आहेत. सर्व तक्रारीतील मजकूर बराच सारखा आणि एकाच व्यक्तीने लिहून दिल्यासारखा वाटतो. त्यामुळे तिला १४ मे २०२२ रोजी कळंबोली पोलिसांनी बोलावून घेतले. कळवा पोलिसांनी तेथे त्यांना ताब्यात घेतले. कळव्याला जाण्यासाठी पोलीस वाहनाकडे नेले जात असतांना केतकीवर हल्ला झाला. आदिती नलावडे आणि अन्य लोकांनी घोषणाबाजी केली. केतकी यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग तसेच पोलिसांवर शाईफेक, अंडीफेकदेखील केली. याप्रकरणी विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला जात नसल्याने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आदिती नलावडे यांच्यावर गुन्हा नोंद होता कामा नये यासाठी पोलिसांवर दबाव असून यामागे एका बलाढ्य राजकारण्यांचा अदृश्य हात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. गुन्हा नोंदविण्यासाठी पोस्टाने कळंबोली स्थानकाला तक्रार पाठवा असे न्यायालयाने सांगितल्याने सर्व पुराव्यासह अशी तक्रार दाखल केली आहे. तरीही ती दाखल न झाल्याने  देशपांडे यांनी खेद व्यक्त केला आहे.

एट्रॉसिटीच्या जामीन अर्जाची मंगळवारी सुनावणीदरम्यान, केतकीविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एट्रॉसिटीच्या गुन्हयासंदर्भात जामीन अर्जाची मंगळवारी तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जामीन अजार्ची १० जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभाग