शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांना ईडीने धाडले पुन्हा समन्स; मंगळवारी हजर राहण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 21:24 IST

Anil Deshmukh summoned again by ED : मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी राज्याचे  माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत आणि वकिलांमार्फत कोणत्याही दुसऱ्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितला. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आता पुन्हा देशमुखांना समन्स पाठवले आहे. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने आज बोलावले होते. मात्र, वैद्यकीय कारण देत आज अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावे असे समन्समध्ये सांगण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्थींना अटक केली आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडीच्या चौकशीसंदर्भात देशमुख यांचे वकील जयवंत पाटील म्हणाले की, “आम्ही ईडीला अर्ज करून चौकशीची अंमलबजावणी कोणत्या आधारे केली जात आहे, याची कागदपत्रे मागितली आहेत.'' आमच्याकडे तपासणीच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. म्हणून आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीला यावर निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना समन्स बजावून शनिवारी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्याला बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) समन्स बजावण्यात आले होते आणि देशमुख यांना हजर होण्यास सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी दुसरी वेळ मागितल्यानुसार ईडीने पुन्हा समन्स बजावून मंगळवारी चौकशीला बोलाविले आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई