शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh Case : सीबीआयविरोधातील राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी १८ जूनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 19:36 IST

Anil Deshmukh Case : मूळ तक्रारदार ऍड. जयश्री पाटील आणि ऍड. घनश्याम उपाध्याय यांनी राज्य सरकारच्या याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याची परवानगी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे मागितली.

ठळक मुद्देसीबीआय राज्य सरकारच्या प्रशासकीय कामांची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुखभ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही भाग वगळावा, यासाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी उच्च न्यायालयाने १८ जून रोजी ठेवली आहे. तोपर्यंत पोलिसांच्या बदल्या व नेमणुकांविषयी फायली व कागदपत्रांचा आग्रह धरणार नाही, असे आश्वासन सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी दिले. 

मूळ तक्रारदार ऍड. जयश्री पाटील आणि ऍड. घनश्याम उपाध्याय यांनी राज्य सरकारच्या याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याची परवानगी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे मागितली. मात्र, राज्य सरकारने यावर आक्षेप घेतला. तर पाटील यांनी राज्य सरकारची याचिका दाखल करून घेण्यावरच आक्षेप घेतला. त्यावर न्यायालयाने पाटील यांना हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आणि राज्य सरकारला त्याव उत्तर देण्याचे निर्देश दिले.

 

भ्रष्टाचाराप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने २१ जून रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील दोन परिच्छेदांवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. या परिच्छेदत नमूद करण्यात आलेल्या बाबींवर सीबीआयला तपास करू नये. उच्च न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसारतपासणी करता सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. सीबीआय राज्य सरकारच्या प्रशासकीय कामांची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती.

वादग्रस्त परिच्छेदांमध्ये सचिन वाझे यांना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करण्यात आल्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या परिच्छेदात पोलीस दलात देण्यात येणाऱ्या बढत्या व बदल्यांबाबत उल्लेख करण्यात आला आहे. एफआयारमधून हे दोन परिच्छेद वगळण्यात यावेत, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १८ जून रोजी ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालयCorruptionभ्रष्टाचार