शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भूलतज्ज्ञाने पत्नी अन् मुलीला भुलीचे इंजेक्शन देऊन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 07:04 IST

विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्गावरील इमारतीत हे ६८ वर्षांचे डॉक्टर त्यांची पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. ते एक अनुभवी भूलतज्ज्ञ होते, तर मुलगी प्राध्यापिका होती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कौटुंबिक विवंचनेतून भूलतज्ज्ञाने स्वतःसह पत्नी आणि मुलीला भुलीचे इंजेक्शन देत  आत्महत्या केल्याची घटना विलेपार्ले येथे घडली. यात त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला असून, पत्नी वाचली आहे. घटनास्थळी त्यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली असून, त्यानुसार विलेपार्ले पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्गावरील इमारतीत हे ६८ वर्षांचे डॉक्टर त्यांची पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. ते एक अनुभवी भूलतज्ज्ञ होते, तर मुलगी प्राध्यापिका होती. कोरोनामुळे गेले दीड वर्ष ते घराबाहेर पडले नव्हते. त्यातच फारशा शस्त्रक्रिया होत नसल्याने त्यांना रुग्णालयातूनही कामासाठी बाेलावण्यात येत नव्हते. मुलीच्या विवाहासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते; पण विवाह जुळत नव्हता. एकंदर या सगळ्या प्रकारांमुळे ते तणावाखाली होते. त्यातच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

या डॉक्टरच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या भूलतज्ज्ञाने दोन दिवसांपूर्वी उशिरा रात्री त्यांनी आपली रक्त तपासणी करू, असे सांगितले होते. त्याचदरम्यान मुलीला आणि पत्नीला त्यांनी भुलीचे इंजेक्शन टोचले असावे. त्यानंतर स्वतःही त्यांनी भुलीचे इंजेक्शन टोचून घेतले असावे. पत्नी सकाळी उठली तेव्हा पती आणि मुलगी दोघेही बेडवर निपचित पडले होते, तसेच त्यांचे शरीरही थंड पडले होते. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. डॉक्टरने पत्नीला दिलेल्या इंजेक्शनमध्ये भुलीच्या औषधाचे प्रणाम कमी झाल्याने पत्नी वाचल्याचा पोलिसांचा कयास आहे.

धार्मिक विधी करू नका!भूलतज्ज्ञाने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे. त्यात आमच्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसून, आमच्या मृत्यूपश्चात कोणताही धार्मिक विधी करू नये, असे नमूद केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई