शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

'हे शोरुम नाही, चोराचे बाईक कलेक्शन आहे...', तरुणाने चोरल्या 100 गाड्या; पोलिसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:49 IST

पोलिसांनी 100+ दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला अटक केली आहे.

Bike Theft :आंध्र प्रदेशपोलिसांनी दुचाकी चोरीची अशी घटना उघडकीस आणली आहे, जी ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. पोलिसांनी एका चोरट्याला पकडले असून, त्याने तीन वर्षात 100 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपी दररोज संध्याकाळी बसने बंगळुरुला जायचा अन् केआर पुरम, टिन फॅक्टरी, महादेवपुरा या निवासी भागातून दुचाकी चोरायचा.

विविध शहरांतून दुचाकी चोरल्यापोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बंगळुरू, तिरुपती, चित्तूरसह अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरल्या आहेत. आरोपी महागड्या दुचाकींना टार्गेट करुन चोरायचे आणि नंतर आंध्र प्रदेशात 15-20 हजार रुपयांना विकायचा. यातून मिळालेल्या पैशातून तो ऐश करायचा. याशिवाय आरोपीने केआर पुरम पोलीस स्टेशन हद्दीतदेखील 25 दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून 20 रॉयल एनफिल्ड, 30 पल्सर, 40 ॲक्सिस आणि इतर वाहने जप्त केली आहेत.

जप्त केलेल्या वाहनांची किंमतजप्त केलेल्या वाहनांची किंमत सुमारे 1.45 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध केआर पुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर चोरट्याला पकडण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बाईक चोरायला शिकलायापूर्वीही असाच एक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका तरुणाने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बाईक चोरायचे शिकला आणि शहरात चोरी करू लागला. व्यंकटेश्वरुलु असे या तरुणाचे नाव आहे. वेंकटेश्वरुलूने यूट्यूबवरून चावी हरवल्यास बाइक कशी सुरू करायची हे शिकून घेतले आणि नंतर चोरी करण्यासाठी त्याचा वापर केला. दुचाकी चोरल्यानंतर तो त्या OLX वर विकायचा आणि कमिशन मिळवायचा.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशbikeबाईकRobberyचोरीPoliceपोलिस