सोशल मीडियावर मैत्री, तरुणीचा लग्नासाठी नकार, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:04 PM2022-12-07T14:04:48+5:302022-12-07T14:12:43+5:30
आंध्रप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचा तिच्याच मित्राने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आंध्रप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचा तिच्याच मित्राने गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील आहे. कथीत प्रेम प्रकरणातून ही घटना घडण्याचे समोर आले.
मिळालेली माहिती अशी, आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने त्याच्या मैत्रीणीचा खून केल्याचे समोर आले. या तरुणीने तरुणाला लग्नास नकार दिला होता, या रागात हा खून केल्याचे समोर आले आहे. धारदार शस्त्राचा वापर करुन तरुणीचा खून केला. या दोघांच्यात काही दिवसापूर्वीच ब्रेकअप झाला होता, तरुणीने लग्नास नकार दिला होता.
या दोघांची २ वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी त्या तरुणाने तरुणीला लग्नासाठी विचारले यावेळी तरुणीने नकार दिला. याचा तरुणाला राग आला, याच रागातून त्याने तरुणीवर हल्ला केला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
ज्ञानेश्वरला त्या तपस्वीला वारंवार भेटण्याचा प्रयत्न करत होता.पण तपस्वीने त्याला नकार दिला. काही महिन्यांपूर्वी तपस्वीने विजयवाडा पोलिसांत त्याच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.
या प्रकरणीमुळे तरुणी गेल्या आठवडाभरापासून गुंटूरजवळील टक्केलापाडू येथे तिच्या मैत्रिणींसोबत राहात होती. मात्र ज्ञानेश्वरने तिचा माग काढला आणि तो गुंटूरला पोहोचला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तपस्नेवी नकार दिला.
प्रेमविवाह केल्याप्रकरणी प्रेमी युगुलाला सरपंचाने दिली तालिबानी शिक्षा, मारहाण केली थुंकला अन्...
यादरम्यान दोघांमध्ये वाद वाढला. त्यानंतर आरोपी तरुणाने चाकू काढून वार केले. ही घटना पाहून मित्राने शेजाऱ्यांना बोलावण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, ज्ञानेश्वरने तपस्वीला बाजूच्या खोलीत बसवून दरवाजा बंद केला. त्यानंतर शेजारी आले असता त्यांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. आरोपीला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तपस्वी यांना तातडीने गुंटूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.