शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् म्हैस ओरडतच मूळ मालकाच्या मागे धावू लागली; चोरीला गेलेली म्हैस सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 19:09 IST

The stolen buffalo was found : सांगोला जनावरांचा बाजार : चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या आले अंगाशी

सांगोला : कोल्हापूर-कुडीत्रे येथून चोरीला गेलेली म्हैस सांगोल्याच्या जनावरांच्या बाजारात दिसताक्षणी मालकाने ती ओळखली. मात्र ग्राहकाने ही म्हैस तुमचीच कशावरून असे फटकारले. यावेळी त्यांनी म्हैस सोडल्यावर कळेल असे म्हणताच सोडलेली म्हैस ओरडतच तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली आणि चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या चांगलेच अंगाशी आले. हा प्रकार रविवारी सांगोल्यातील जनावरांच्या बाजारात उघडकीस आला. म्हैस खरेदी करणारे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकाला टमटमसह ताब्यात घेतले. तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.कुडीत्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील महेश विलास पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली १० हजार रुपये किंमतीची मुऱ्हा जातीची व एक शिंग नसलेली म्हैस तिच्यासोबत ४ हजार रुपयांच्या सहा महिन्याच्या गावठी म्हशीसह १ हजार रुपयांचे सहा महिन्यांचे रेडकू चोरीला गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले होते.

याबाबत त्यांनी करवीर पोलिसात म्हैस चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, महेश पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रांनी रविवारी सांगोल्यातील जनावरांचा बाजार गाठून चोरीला गेलेल्या म्हशीचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना नेमके त्यांच्या म्हशीसह रेडकू झाडाला बांधलेल्या अवस्थेत उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तिच्याजवळ जात ही म्हैस, रेडकू माझे आहे, असे सांगताच तिथे असलेल्या ग्राहकाने ही म्हैस तुमचीच कशावरून, असा प्रश्न उपस्थित केला.

...अन् गुन्ह्याचा झाला पश्चाताप! मुलीचा छळ करणाऱ्या जावयाचा खून; स्वतः केली गळफास लावून

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; 12 तासात महिलेसह दोघांना अटक यावेळी म्हैस मालक महेश पाटील यांनी म्हैस सोडून तर बघा म्हणजे कळेल, असे म्हणताच त्याने ती सोडली आणि म्हैस ओरडतच मालकाच्या मागे धावू लागल्याने त्याचे पितळ उघडे पडले. म्हैस सापडल्यानंतर त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली. दरम्यान, म्हैस चोरीला गेल्याबाबत महेश पाटील यांनी ५ डिसेंबर रोजी करवीर पोलिसात तक्रार दिल्यामुळे आता करवीर पोलिस येऊन म्हैस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महेश पाटील यांना म्हशीसह रेडकू ताब्यात मिळणार आहे.ही कामगिरी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अस्लम काझी, हवालदार चंद्रकांत गोडसे, पोलीस नाईक केदारनाथ भरमशेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, गणेश कोळेकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस