अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 19:32 IST2021-10-22T19:31:35+5:302021-10-22T19:32:44+5:30
Ananya Panday : एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं.

अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी
मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबीकडून आजची चौकशी संपली. अनन्या पांडे चौकशीसाठी आज दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहिली होती. वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात अनन्यासोबत हजर राहिले होते. अनन्या पांडेची आज चार तास झाली चौकशी झाली तर काल दोन तास चौकशी झाली. ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबत झालेल्या चॅटमध्ये अनन्याचं ही नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. सोमवारी पुन्हा पांडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती NCB चे डीजी अशोक जैन यांनी दिली. अनन्याला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे
बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या कारणांमुळे चर्चा रंगलीय. अमली पदार्थ, छापेमारी, चौकशी, एनसीबी, आरोप-प्रत्यारोप या सर्व गोष्टींमुळे बॉलिवूड सध्या चर्चेत आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या तुरुंगात आहे. आता त्या पाठोपाठ चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता २१ वर्षीय अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे.
काल गुरूवारी एनसीबी अधिकारी अनन्या पांडेच्या घरी धडकले. तसेच शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्यावरही एनसीबी अधिका-यांनी पाहणी केली. अनन्या पांडे ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्यनचे काही व्हॉट्सअॅप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे. या चॅटमध्ये नशेबाबत बोलणं झालं होतं. ही अभिनेत्री म्हणजे, अनन्या पांडे असल्याचं समजतंय. त्यामुळे आता अनन्या पांडेची चौकशी सध्या एनसीबी कडून सुरू आहे.पुढील काळात तिच्या चौकशीतून काही निष्पन्न होतं. तसेच या ड्रेस पार्टी प्रकरणाचा लिंक अजून कोणापर्यंत पोहोचतात हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.