शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात आनंदराव अडसुळ यांची हायकोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:31 PM

Ed case : ईडीने २७ सप्टेंबर रोजी आनंद अडसुळ व त्यांचा मुलगा अभिजीत अडसुळ यांना समन्स बजावले.

मुंबई : सिटी को- ऑपरेटिव्ह  बँकेत ९८० कोटी घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार व शिवसेना नेते  आनंदराव अडसुळ यांच्यावर ईडीने मनी लॉंडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याविरोधात अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

 

ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही अडसुळ यांनी न्यायालयाला केली. या याचिकेवरील सुनावणी एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती. 

अडसुळ यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

तपासाचा भाग म्हणून अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. 

ईडीने २७ सप्टेंबर रोजी आनंद अडसुळ व त्यांचा मुलगा अभिजीत अडसुळ यांना समन्स बजावले. मात्र, अडसुळ यांनी दिल्लीमध्ये साखरपुडा असल्याचे कारण देत चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तब्येत खराब झाल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाले.

अडसुळ यांची तब्येत ठीक आहे. असेच घडत राहिले तर तपास यंत्रणेला तपास करणे अवघड जाईल. ईडीने समन्स बजावले की वैद्यकीय कारण दिले जाते, असे सिंग यांनी म्हटले.

त्यावर न्यायालयाने अडसुळ यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांना अडसुळ यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देत याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. 

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालय