शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Cyrus Mistry: अनाहिता पंडोले वेगमर्यादा ओलांडणाऱ्या नेहमीच्या पाहुण्या; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूस जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 08:08 IST

तब्बल सात वेळा भरला दंड; जामीनपात्र गुन्ह्यामुळे अटक नाही

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : अपघातात जीव गमवावे लागलेले प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारच्या चालक डॉ. अनाहिता पंडोल यांनी महामार्गावर अपघात होण्याआधी अनेक वेळा वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात वेळा त्यांच्याकडून दंड वसूल केल्याची बाब पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. यामुळे या अपघातात गेलेले दोन बळी हे भरधाव वेगाने कार चालविल्यामुळे झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 

डॉ. अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी तो जामीनपात्र असल्यामुळे त्यांना अद्याप अटक केलेली नाही, असे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबत कारमध्ये पाठीमागे बसलेले जहांगीर पंडोल यांचा ४ सप्टेंबरला मुंबई-अमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला भरधाव मर्सिडीज कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कार चालविणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल आणि त्यांच्या शेजारी बसलेले दरियस पंडोल जबर जखमी झाले होते. 

अपघातानंतरच्या पोलिस चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून डॉ. अनाहिता आणि अपघातग्रस्त कार नावावर असलेल्या जे. एम. फायनान्शियल कंपनीला पालघर आणि मुंबई पोलिसांनी अनेक वेळा वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 

डॉ. पंडोल चालवीत असलेल्या मर्सिडीज कारमधील डेटा रेकॉर्डप्रमाणे चालक प्रतितास १०० किलोमीटर वेगाने गाडी चालवत असताना मार्गिकेबाबत ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नव्हता. या अपघातात जखमी झालेल्या दरियास पंडोल यांनीही पोलिसांनी दिलेल्या जबाबात डॉ. अनाहिता यांना तिसऱ्या मार्गिकेमधून दुसऱ्या मार्गिकेत येणे शक्य झाले नाही, असा जबाब नोंदवला आहे.

लवकरच चार्जशीट दाखल करणार डॉ. अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमान्वये सात वर्षांच्या शिक्षेचे प्रयोजन नाही. तसेच गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांचा जबाब घेणे बाकी असून लवकरच न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. पंडोल यांचा चालक परवाना रद्द करण्याची सूचनापालघर पोलिसांनी अपघातप्रकरणी दाखल केलेल्या एफआरआयमध्ये डॉ. पंडोल यांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, महामार्गावरील मार्गिकेचे शिस्तपालन करताना अपघाताला आमंत्रण देणे, असे आरोप ठेवत त्यांचा चालक परवाना रद्द करण्यात यावा, असे नमूद केले आहे. 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीAccidentअपघातPoliceपोलिस