पत्नीच्या पाया पडत म्हणाला, मला माफ कर अन् १९ व्या मजल्यावरून उडी मारली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:02 IST2022-04-29T13:01:48+5:302022-04-29T13:02:00+5:30
मृत राजकुमार काही दिवसांपासून आजारामुळे मानसिक तणावाखाली होते.

पत्नीच्या पाया पडत म्हणाला, मला माफ कर अन् १९ व्या मजल्यावरून उडी मारली, मग...
नोएडा – दिल्लीहून जवळ असलेल्या नोएडा येथे शुक्रवारी सकाळी एका वृद्धाचा १९ व्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला आहे. नोएडा सेक्टर १३७ च्या सुपरटेक इको सिटीतील ही घटना आहे. ज्याठिकाणी ७० वर्षीय राजकुमार कथितरित्या खाली उडून जीव दिल्याचं म्हटलं जात आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात गुंतली आहे.
रिपोर्टनुसार, सोसायटीच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी मृत राजकुमार हे पत्नीच्या पाया पडले. मला माफ कर आणि खाली उडी मारली. मृत राजकुमार एका इन्शुरन्स कंपनीत काम करत होते. राजकुमार इको सिटी सोसायटीत एका टॉवरमध्ये १९ व्या मजल्यावर फ्लॅटनंबर १८०२ मध्ये पत्नीसोबत राहत होते. घरात उपस्थित असणाऱ्या पत्नीला काही कळण्याच्या आत नवऱ्याने खाली उडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार, बालकनीत स्टूलवर चढून वृद्धाने खाली उडी मारली.
मृत राजकुमार काही दिवसांपासून आजारामुळे मानसिक तणावाखाली होते. वृद्धाने उडी मारल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने वृद्धाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. यापूर्वी २१ एप्रिलला बिहारच्या पूर्णिया इथं एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.