शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

'अभ्यासाला कंटाळलेय', पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही; चिठ्ठीने गूढ वाढवलं, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:33 IST

प्रियांका निलकंठ आलाटकर (वय १९, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.

सातारा : एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील विलासपूरमध्ये सोमवारी दुपारी उघडकीस आली. अभ्यासाला कंटाळलेय; पण ते माझ्या मृत्यूचं कारण नाही, अशी चिठ्ठी लिहून विद्यार्थिनीने स्वत:च्याच मृत्यूचं गूढ वाढवलंय. यामुळे साताऱ्यात खळबळ उडालीय.

प्रियांका निलकंठ आलाटकर (वय १९, रा. विलासपूर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियांका आलाटकर ही तरूणी पुणे येथील ससून वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. मंगळवारपासून तिची परीक्षा सुरू होणार होती. त्यासाठी ती सोमवारी सायंकाळी चार वाजता पुण्याला जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच तिने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास`थळी धाव घेतली.

प्रियांकाच्या बेडरुममधील खोलीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीमध्ये प्रियांकाने ‘मी अभ्यासाला कंटाळले आहे. पण माझ्या मृत्यूचं कारण ते नाही. हा माझा स्वत:चा निर्णय असून, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा उल्लेख केला आहे. यामुळे प्रियांकाच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. सोमवार सकाळपासून ती तणावात होती. फारशी कोणाशी बोलायचीही नाही. असे पोलीस सांगत आहेत. अचानक तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याने तिच्या आर्इवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. कितीही अडचणी आल्या तरी तीडगमगणारी नव्हती. तिला डाॅक्टर होऊन स्वत:चं हाॅस्पीटल थाटायचंहोतं. असं एका तिच्या नातेवाइकांन सांगितलं.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यूPoliceपोलिस