४ खून करून गोव्यात लपलेले अमृतसरचा अमृतसींग व समवाल सिंग जेरबंद
By वासुदेव.पागी | Updated: November 6, 2023 14:34 IST2023-11-06T14:33:53+5:302023-11-06T14:34:35+5:30
दोघांनाही झुवारीनगर सांकवाळ येथून अटक करण्यात आल्याची माहिती गोवा क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली आहे.

४ खून करून गोव्यात लपलेले अमृतसरचा अमृतसींग व समवाल सिंग जेरबंद
पणजी: ज्यांच्या नावावर चार खुनांचे गुन्हे नोंद झाले आहेत असे पंजाबमधील अटट्टल गुन्हेगार समवाल गुरूनान सिंग व अमृत केवल सिंग या दोघांनाही गोवा पोलिसांचच्या मदतीने पंजाब पोलिसांनी गोव्यात जेरबंद केले आहे.
दोघांनाही झुवारीनगर सांकवाळ येथून अटक करण्यात आल्याची माहिती गोवा क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली आहे. हे दोघे २२ वर्षे वयाचे गुन्हेगार पंजाबमध्ये ४ खून करून फरार झाले होते. त्यांच्या विरोधात पंजाब भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२, १२०ब, आणि २५, २७ या कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केल्यानंतर ते तेथून गायब झाले होते. ते गोव्यात लपल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाल्यानंतर गोवा पोलिसांशी संपर्क साधला.
गोव्याच्या क्राईम ब्रँचकडून पुढची कामगिरी पार पाडताना दोघेही सांकवाळ येथील झुआरीनगर भागात एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर त्यांना पकडण्याची मोहीम पंजाब पोलिसांच्या मदतीने फत्ते करण्यात आली आहे. पंजाप मधील अमृतसर ग्रामीण पोलिसांचे पथक गोव्यात याच कामासाठी दाखल झाले होते. गोवा क्राईम ब्रँचच्या सहाय्याने नियोजनबद्द कारवाई करताना दोघांनाही पळून जाण्याची संधी न देता अटक केली. ट्रान्सिट रिमांड मिळवून संशयितांना पंजाबला नेण्यात येणार आहे.