शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनकाराला घातला साडेआठ लाखांचा गंडा, १३५ कोटींच्या आमिषापोटी भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:14 IST

मोहापासून दूर रहावे असे प्रवचन देणाऱ्या किर्तनकारालाच १३५ कोटींचा मोह आवरला नाही अन्...

सोलापूर : मोहापासून दूर रहावे असे प्रवचन देणाऱ्या किर्तनकारालाच १३५ कोटींचा मोह आवरला नाही अन् खासगी कंपन्याकडून पैसे मिळवून देण्याचे सांगणाºया भामट्यांनी महाराजांना आठ लाख ५0 हजार रूपयांना फसविले. वारंवार पाठपुरावा करुन तसेच पुणे वारी करून थकलेल्या महाराजांनी शेवटी पोलिसांत फिर्याद दिली.पुण्यातील मंदार क्षीरसागर, रमेश पुणतांबेकर, किशोर शिंदे व सोलापूरचे गजानन कवठीकर, सुधाकर बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर अनंत इंगळे महाराज (लक्ष्मी पेठ, सोलापूर) यांची श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था आहे. त्यांच्या परिचयाचे सुधाकर बिराजदार हे आॅक्टोबर २0१७ मध्ये संस्थेच्या कार्यालयात आले होते. खासगी कंपन्यांकडून सीएसआर फंडातून निधी मिळवून देतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर इंगळे महाराज, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ केसरे आणि दोघे-तिघे पुणे येथे गेले. तेथे सुधाकर बिराजदार यांनी किशोक शिंदे, वरमेश पुणतांबेकर यांची भेट घालून दिली. संस्थेची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुम्हाला खासगी कंपनीकडून आॅनलाईन बँकिंगद्वारे १३५ कोटी मिळतील, असे संबंधितांनी सांगितले. गजानन कवठीकर नावाचा व्यक्ती ही मदत करणार असून, तुम्हाला मिळालेल्या रकमेपैकी १0 टक्के रक्कम आम्हाला द्यावी लागेल, असे या भामट्यांनी सांगितले.गजानन कवठीकर याचा विश्वास संपादन करण्यासाठी अगोदर १0 लाख रूपये द्या, अशी मागणी आरोपींनी केली. मागणीनुसार १७ फेब्रुवारी २0१८ रोजी ५ लाख व १ लाख, २१ फेब्रुवारी रोजी एक लाख रूपये असे एकूण ७ लाख रूपये लोकमंगल को-आॅप. बँकेच्या धनादेशाद्वारे दिले.धनादेश वटलाच नाही२ मार्च २०१८ रोजी एक लाख व १३ मार्च रोजी ५0 हजार असे ८ लाख ५0 हजार आरोपींना देण्यात आले. पैसे दिल्यानंतर आॅनलाईन बँकिंगद्वारे मिळणाºया पैशांची विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रमेश पुततांबेकर यांनी आठ लाख ५0 हजार रूपयांचा धनादेश दिला मात्र तो वटला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे इंगळे महाराजांच्या लक्षात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर