शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

Amaravati Crime | ना OTP दिला, ना बारकोड स्कॅन केला; तरीही गमावले ५.७४ लाख, अमरावतीत घडला प्रकार

By प्रदीप भाकरे | Updated: January 29, 2023 14:48 IST

ऑनलाईन फसवणूक: डागा सफायरमधील व्यावसायिकाला गंडविले

अमरावती: मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला, क्युआर कोडस्कॅन केला, अन बॅंक खात्यातील पैसे परस्पर उडाले, अशा फसवणुकीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, येथील एका व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल ५ लाख ७४ हजार रुपये परस्पर डेबिट झाले. ना त्यांनी कुणाला ओटीपी पाठविला ना कुठला क्यु आर कोड स्कॅन केला. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या या ऑनलाईन फसवणकुीप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन महिन्यानंतर २८ जानेवारी रोजी गुन्ह्याची नोंद केली.

येथील जोशी कॉलनी स्थित डागा सफायरमध्ये राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यावसायिकाचे तीन बॅंकेत खाती आहेत. दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास झोपेतून उठल्याबरोबर त्यांना मोबाईलवर बॅंकेकडून आलेले संदेश दिसले. तिनही बॅंक खात्यातून ५ लाख ७४ हजार रुपये अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाल्याचे ते संदेश पाहून ते नखशिखांत हादरले. विशेष म्हणजे त्यांना त्याबाबत कुणाचाही फोनकॉल आला नाही. त्यांनी कुणाला ओटीपी वा अन्य कुठलिही माहिती शेअर केली नाही. तरीदेखील अनोळखी आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. लेखी तक्रार नोंदविली. सायबर पोलीस ठाण्याने पुरेसी खातरजमा केल्यानंतर २८ जानेवारी रोजी दुपारी दिडच्या सुमारास अनोळखी आरोपीविरूध्द फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.

पैसे स्विकारताना ओटीपी लागत नाही

ओटीपी फक्त पैसे देताना लागतो. पैसे स्विकार करणाऱ्या माणसाला ओटीपीची गरज पडत नाही. अनेकदा नव्या यूजरला पाठवलेले पैसे स्विकारण्यासाठी ओटीपी लागतो, असं खोटं सांगूनही ओटीपी उकळला जातो. मात्र, जो यूजर पैसे पाठवणार आहे, फक्त त्याच्याच मोबाईल नंबरवर ओटीपी येतो, हे नेहमी लक्षात ठेवावे.

सायबर करीत आहे सुक्ष्म तपास

पैसे भरताना फक्त अधिकृत ॲप्स किंवा वेबसाइटचाच वापर करावा. वेबसाईट अथवा ॲप अधिकृत नसेल, तर ओटीपी ट्रॅक करून पैशाची चोरी केली जाते. ओटीपीशिवाय यूजरची खासगी माहितीही अश्या ॲप्समधून लिक होते. त्यामुळे डागा सफायरमधील त्या व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक होण्यापुर्वी त्यांना काही मॅसेज आले का, त्यांनी कुठल्या लिंकवर क्लिक केले का, या अंगाने तपास केला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAmravatiअमरावती