शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 23:18 IST

पकडण्यात आलेल्या 70 वर्षीय व्यक्तीवर बँकेच्या अडीच लाखांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपीला 30 वर्षांपूर्वी त्याच्या कुटूंबाने मृत घोषित केले होते.

ठळक मुद्दे 30 जुलै 1990 रोजी सीबीआयने जालंधरमधील युनायटेड कमर्शियल बँकेच्या शाखेत निर्मल सिंह बाठ नावाच्या व्यक्तीविरूद्ध अडीच लाख रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. हा माणूस 1980 ते 1985 दरम्यान बँकेचा मॅनेजर होता. दुसरीकडे, निर्मल सिंहने बनावट ओळखपत्र मिळवून आपली ओळख बदलली आणि मृणाल सिंहच्या नावे पासपोर्ट मिळवला.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने ३० वर्षांपूर्वी मृत घोषित केलेल्या एकाला अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या 70 वर्षीय व्यक्तीवर बँकेच्या अडीच लाखांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपीला 30 वर्षांपूर्वी त्याच्या कुटूंबाने मृत घोषित केले होते.30 जुलै 1990 रोजी सीबीआयने जालंधरमधील युनायटेड कमर्शियल बँकेच्या शाखेत निर्मल सिंह बाठ नावाच्या व्यक्तीविरूद्ध अडीच लाख रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. हा माणूस 1980 ते 1985 दरम्यान बँकेचा मॅनेजर होता.सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडिया टुडेला सांगितले की, "निर्मल सिंह यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून बनावट लोकांच्या नावावर ट्रॅक्टर, दुग्धजन्य पदार्थ आणि किरकोळ व्यापारासाठी कर्ज देऊन बँकेची फसवणूक केली." सीबीआयने निर्मल सिंगविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. परंतु ते या खटल्याच्या सुनावणीदरम्यान बेपत्ता झाले. 1993 मध्ये कोर्टाने त्याला दोषी घोषित केले होते. परंतु निर्मल बेपत्ता होते. त्याचवेळी, निर्मल सिंह यांच्या जवळच्या लोकांनी उत्तर प्रदेशमधील सहलीदरम्यान अपघात झाल्याची एक कथा तयार केली. या कुटुंबाने सांगितले की, निर्मल सिंह यांचा अंतिम संस्कार करण्यात आला आणि निर्मल सिंगचे बनावट मृत्यूचे प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने निर्मल सिंगच्या मृत्यूची माहिती काढली नाही आणि निर्मल सिंगचा शोध सुरू ठेवला.दुसरीकडे, निर्मल सिंहने बनावट ओळखपत्र मिळवून आपली ओळख बदलली आणि मृणाल सिंहच्या नावे पासपोर्ट मिळवला. निर्मल सिंहचे  मृणाल सिंह हे बदललेले नाव व बनावट पासपोर्ट घेऊन अमेरिकेत गेले होते. निर्मल सिंह मृणाल सिंह होण्याच्या संपूर्ण कथेविषयी माहिती नसल्यामुळे याबाबत सीबीआयचा शोध अजूनही सुरू आहे. निर्मल सिंह पटियाला येथे राहत असल्याची माहिती नुकतीच सीबीआयला मिळाली. सीबीआयच्या पथकाने त्याच्या निवासी पत्त्यावर छापा टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.

दिल्ली सरकारचा 'या' रुग्णालयाला दणका, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

 

Coronavirus : ईडीच्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग, दिल्लीतील मुख्यालय सील

 

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

 

कोर्टाने 12 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीसूत्रांचे म्हणणे आहे की, सीबीआय पथकाकडे पाहून निर्मल सिंह यांनी स्वत:  ची ओळख  देण्यास  नकार दिला आणि म्हटले की, बँक घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या व्यक्तीला ते शोधत आहेत ते कोणीतरी दुसरे आहेत. पकडल्यानंतर निर्मल सिंह यांनी बँक घोटाळ्याप्रकरणी अनभिज्ञ असल्याचे दाखवले. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निर्मल सिंह यांच्या निवासस्थानी छापेमारीदरम्यान आमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, इतर ओळखपत्रे, पासपोर्ट आणि अमेरिकेत टेक्सास अथॉरिटीने जारी केलेली अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. निर्मल सिंह यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 12 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पण निर्मल सिंह यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना चंदीगडच्या पीजीआयमध्ये दाखल केले आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागfraudधोकेबाजीArrestअटकpassportपासपोर्टDeathमृत्यूCourtन्यायालयbankबँक