शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमधील काँग्रेसच्या नेत्याला बेड्या, अलिबाग पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 14:02 IST

Congress Leader Arrested : प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून अ‍ॅड. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल

रायगड : विराेधात तक्रारी करणाऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवणे काँग्रेसच्या नेत्याला महागात पडले आहे. अलिबागपोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. प्रकृती बिघडल्याच्या कारणावरून अ‍ॅड. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल केले आहे.

आरोपी अ‍ॅड. उमेश ठाकूर यांचा व्यवसाय अवैध आहे. याबाबत पेण तालुक्यातील कोलेटी येथील काशीनाथ ठाकूर हे विविध कार्यालयात तक्रारी करत होते. त्यामुळे उमेश ठाकूर याला व्यवसायात मोठे नुकसान होत होते. आपल्या विरोधातील तक्रारीने उमेश ठाकूर हैराण झाला होता. त्यांनी काशीनाथ ठाकूर यांचा काटा काढण्याचे षड्यंत्र रचले. शुभम गुंजाळ यांच्या मदतीने काशीनाथ ठाकूर यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. तसेच आपल्याच ओळखीतील मनिषा चोरडेकर हिला त्यावरुन अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठवले.या व्हिडिओ आणि मेसेजच्या आधारे मनिषा चोरडेकर हिने काशीनाथ ठाकूर यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सायबर सेलची मदत घेतली. सायबर सेलने केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. यात शुभम गुंजाळ हा सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्याची सखोल चौकशी केली असता उमेश ठाकूर हा या कटाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. महत्वाचे म्हणजे ज्या महिलेने तक्रार दिली होती ती मनिषा चोरडेकर या कटात सहभागी होती.अ‍ॅड. उमेश ठाकूर, शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही न्यायलयाने 11 जानेवारी राेजी तीन दिवसांची पाेलिस कस्टडी दिली हाेती. प्रकृतिच्या कारणाने उमेश सरकारी रुग्णालयात आहे. आज दुपारी तिनही आराेपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Arrestअटकcongressकाँग्रेसalibaugअलिबागPoliceपोलिस