लष्करी जवानाकडून तरुणीवर लॉजमध्ये शारीरिक अत्याचार

By श्याम बागुल | Updated: August 11, 2023 16:50 IST2023-08-11T16:49:04+5:302023-08-11T16:50:25+5:30

अकोल्यातील पीडितेची तक्रार, पोलिसांत गुन्हा दाखल

Akola Girl physically assaulted by army personnel in lodge | लष्करी जवानाकडून तरुणीवर लॉजमध्ये शारीरिक अत्याचार

लष्करी जवानाकडून तरुणीवर लॉजमध्ये शारीरिक अत्याचार

श्याम बागुल, नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून लष्करातील जवानाने एका तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजिंगमध्ये हा प्रकार घडला असून, विवाहास नकार दिल्याने अकोला येथील तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय गायकवाड (२७, मूळ रा.अमरावती, हल्ली पुणे) असे संशयिताचे नाव असून तो लष्करातील सेवेत आहे. याप्रकरणी मूळच्या अकोला येथील २६ वर्षीय पीडित युवतीने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे मित्र-मैत्रीण आहेत. सन २०१८ मध्ये युवती नाशिक शहरात खासगी नोकरी करीत असताना हा प्रकार घडला. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयित तरुणाचे लग्नाचे आमिष दाखवले. गेल्या पाच ते सहा वर्षांच्या काळात संशयिताने नाशिक गाठून वेळोवेळी मेहर सिग्नल, ठक्कर बाजार परिसरातील हॉटेल, लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने संशयिताने लग्नास नकार देऊन बदनामी करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला असून अधिक तपास सहायक निरीक्षक नितीन खैरनार करीत आहेत.

Web Title: Akola Girl physically assaulted by army personnel in lodge

टॅग्स :Akolaअकोला