शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पत्नीला मारलं, पोत्यात भरलं पण पोतंच फाटलं अन् हात आला बाहेर; 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 15:39 IST

एका व्यक्तीने लग्नानंतर 26 व्या दिवशीच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रेमविवाह होता.

राजस्थानच्या अजमेरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने लग्नानंतर 26 व्या दिवशीच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रेमविवाह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश केसवानी याने 29 ऑक्टोबरला जेनिफर नावाच्या तरुणीसोबत लग्न केलं होतं. 

शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती-पत्नी फार कमी वेळा घरातून बाहेर पडायचे. तसेच कोणाशी जास्त बोलायचे देखील नाहीत. बुधवारी दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. त्यानंतर घरातून मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. पण अचानक काही वेळाने आवाज येणं बंद झालं. रोजच भांडण होत असल्याने शेजाऱ्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. काही वेळाने मुकेश घराबाहेर गेला व जवळपास 20 मिनिटांनंतर परतला. थोडा वेळ गेल्यानंतर तो मोठं पोतं घेऊन घराबाहेर निघाला.

पोतं खालून फाटलं आणि जेनिफरचा हात पडला बाहेर

स्कूटीवर ते पोतं ठेवलं. परंतु घाईघाईमध्ये पोतं खालून फाटलं व त्यातून जेनिफरचा एक हात बाहेर पडला, केसही दिसले. हा भयंकर प्रकार पाहताच शेजारच्यांचा अंगावर काटा आला. मुकेश ते पोतं घेऊन पसार झाला. तोपर्यंत शेजाऱ्यांनी सर्व प्रकार पोलिसांना कळवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीत प्रचंड वाद झाला. दोघे एकमेकांवर जोरजोरात ओरडत होते. जेनिफरने तिच्या आई-वडिलांना सर्व सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन मुकेशने चाकूने भोसकून जेनिफरचा निर्घृण खून केला. जेनिफरच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. 

हुंड्याची मागणी करून जेनिफरचा छळ

मुकेशनं अतिशय विकृत पद्धतीने पत्नीची हत्या केल्याचं पोलीस महानिरीक्षक रुपिंदरसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुकेश हा हुंड्याची मागणी करून जेनिफरचा छळ करत होता, अशी तक्रार जेनिफरच्या भावाने केली आहे. मुकेशच्या आईवडिलांना दोघांचं लग्न मान्य नव्हतं त्यामुळे ते दोघं लग्नानंतर वेगळे राहत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. मुकेशला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने त्यानंतर पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न