शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अजमेर गँगरेप प्रकरणातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; 100+ तरुणींवर झालेला अत्याचार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 16:33 IST

नफीस चिश्ती, नसीम उर्फ ​​टारझन, सलीम चिश्ती, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन आणि इक्बाल भाटी अशी आरोपींची नावे आहेत.

Ajmer Gangrape and Blackmail News : 32 वर्षांपूर्वी राजस्थानच्या अजमेरमध्ये घडलेल्या बहुचर्चित सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा आज निकाल लागला. विशेष पोक्सो न्यायालयाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नफीस चिश्ती, नसीम उर्फ ​​टारझन, सलीम चिश्ती, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन आणि इक्बाल भाटी अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 1992 मध्ये आरोपींनी अजमेरमधील 100 हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर त्यांची अश्लील छायाचित्रे काढून पीडितांना ब्लॅकमेल करण्यात आले होते.  या प्रकरणात एकूण 19 आरोपी होते, त्यापैकी नऊ जणांना आतापर्यंत शिक्षा झाली आहे. या घटनेनंतर दोन वर्षांनी 1994 मध्ये आणखी एका आरोपीने आत्महत्या केली, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित 6 आरोपींबाबत आज न्यायालयाने निकाल दिला.

अपहरणानंतर करायचे बलात्कार...आरोपी आधी तरुणींना आमिष दाखवून त्यांचे अपहरण करायचे आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची आक्षेपार्ह फोटो काढायचे. पुढे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना वारंवार ब्लॅकमेल केले जायचे. पीडित मुलींचे वय 11 ते 20 च्या आसपास होते. या मुली अजमेरच्या एका नामांकित शाळेत शिकायच्या. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर राजस्थानच्या तत्कालीन भैरो सिंह शेखावत सरकारने सीबीसीआय तपासाचे आदेश दिले होते.

या घटनेतील आरोपींच्या मागे राजकीय हात होता, त्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. धमक्यांना घाबरुन पीडित तरुणींना पोलिसांना जबाब देण्याचे टाळले होते. आरोपींचा प्रभाव जास्त असल्याने पोलीसही कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर, तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांच्या आदेशावरून पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला. अजमेरच्या या सत्य घटनेवर 'अजमेर डायरी' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगCourtन्यायालय