नववर्षाच्या पार्टीत एअर हॉस्टेसवर सामूहिक बलात्कार; सकाळी मृतदेह दिसताच खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:33 IST2021-01-06T01:15:32+5:302021-01-06T07:33:30+5:30
Crime News: हॉटेलमध्ये नव्या वर्षाच्या पार्टीतील घटना : ११ जणांना अटक

नववर्षाच्या पार्टीत एअर हॉस्टेसवर सामूहिक बलात्कार; सकाळी मृतदेह दिसताच खळबळ उडाली
मकाती (फिलिपिन्स) : फिलिपिन्समध्ये हवाई सुंदरी क्रिस्टीन डेकेरा (२३) नवीन वर्षाची पार्टी आपल्या मित्रांसोबत साजरी करत असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला व त्यात तिचा मृत्यूही. यामुळे देशात मोठी खळबळ उडाली असून, समाजमाध्यमांवर तो चर्चेचा विषय ठरला आहे. बलात्कार व मृत्यूप्रकरणी ११ जणांना अटक झाली आहे.
मंगळवारी सकाळीही ट्विटरवर जस्टीस फॉर क्रिस्टीन डेकेरा जगभर ट्रेंड केला गेला.
क्रिस्टीन डेकेरा फिलिपिन्स एअरलाइन्समध्ये नोकरीस होती. ती नव्या वर्षाची पार्टी आपल्या मित्रांसोबत साजरी करण्यासाठी मकातीतील एका हॉटेलमध्ये थांबली होती. सकाळी मित्रांनी क्रिस्टीनला मृतावस्थेत पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांना क्रिस्टीनच्या मृतदेहावर अनेक खुणा दिसल्या त्या सामूहिक बलात्काराची साक्ष देत होत्या. एअरलाइन्सने काहीही भाष्य केलेले नाही.
या घटनेप्रकरणी ११ जणांना अटक झाली. यातील तीन जण हे त्या रात्रीच्या पार्टीत सहभागी होते. क्रिस्टीन माझी परवानगी घेऊन पार्टीला आली होती. कारण ती तिच्या मित्रां सोबत होती म्हणून तिला जायची परवानगी दिली, असे तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले. दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमी तिच्या आईला समजली.