शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मूल होत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेकडुन अघोरी पूजा; भिगवण येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 7:55 PM

गेल्या काही दिवसांपासून अपत्यप्राप्तीसाठी परिसरात अघोरी प्रकार सुरु आहे.

ठळक मुद्देपतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल ; महिला मांत्रिक आणि तिच्या सहकारी महिलेचा देखील समावेश

बारामती  : मूल होत नसल्याच्या कारणावरुन एका विवाहितेकडुन अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण (ता.इंदापुर) येथे उघडकीस आला आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात संबंधित विवाहितेने छळ आणि मुल होण्यासाठी अघोरीप्रकार केल्याची तक्रार दिली आहे.त्यानुसार पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये महिला मांत्रिक आणि तिच्या सहकारी महिलेचा देखील समावेश आहे.  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कोमल नितीन कदम  (वय.२१ धंदा.घरकाम रा . भिगवण वॉर्ड नं 2 , जाणता राजा चौक , ता इंदापुर जि. पुणे ) या विवाहितेने फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पती नितीन दिलीप कदम ,सासरा दिलीप तुकाराम कदम ,सासु सिमा दिलीप कदम यांच्यासह सोलनकर महिला (पूर्ण नावमाहित नाही सर्व रा.भिगवण वॉर्ड नं २ ता. इंदापुर जि. पुणे ) स्वामी चिंचोली ता.दौंड जि पुणे )येथे राहणारी आरोपी नं ४ हिची सहकारी महिला पूर्ण नाव माहित नाही)अशा एकुण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर २०१६ ते २७ जुन २०२० दरम्यान हा प्रकार विवाहितेच्या सासरी घडला आहे. पती आरोपी नितीन कदम,सासरा दिलीप कदम,सासु सीमा कदम  यांनी संगनमत करून विवाहितेला मुलबाळ होत नसलेच्या कारणावरून वारंवार शारीरीक व मानसिक त्रास दिला. शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करून जाचहाट केला तसेच इतर दोघी महिला आरोपींनी आपल्यामध्ये अलौकिक व अतेंद्रीय शक्ती आहे, असे भासवले. विवाहितेच्या मनात भिती बसवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुला मुल होणार नाही अशी भिती दाखविली.विवाहितेच्या डोक्याच्या केसाच्या दोन बटा अमानुषपणे उपटल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार अविनाश काळे करीत आहेत. दरम्यान,या घटनेची माहिती समजताच बारामती येथील अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.अंनिसचे बारामती तालुका कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी 'लोेकमत' शी बोलताना सांगितले कि, गेल्या काही दिवसांपुर्वी झारगडवाडी(ता.बारामती) येथे अघोरी पुजा करण्यात आली होती. अपत्यप्राप्तीसाठी परिसरात अघोरी प्रकार सुरु आहेत. त्या महिलेच्या डोक्यावरील केसाच्या बटा उपटण्यात आली आहे.तसेच त्या महिलेच्या अंगावर लिंबु कापल्याची माहिती मिळत आहे.समाजात असे प्रकार थांबण्याची गरज आहे. त्यासाठी समाजप्रबोधन आणि कडक कारवाईची गरजपाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BhigwanभिगवणCrime Newsगुन्हेगारीMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीWomenमहिलाPoliceपोलिस