शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Whats App चॅटनंतर आता नवाब मलिकांनी उघड केले के पी गोसावीचे ऑडिओ क्लिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 15:56 IST

K P Gosavi's Audio Clips : के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. 

मुंबईतील ड्रग्ज क्रूझ पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू केलेली आरोपांची मालिका अजूनही कायम आहे. नवाब मलिक यांनी आज आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के पी गोसावी याचे एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर झालेले संभाषण ट्विट केले आहे. या संभाषणाच्या क्लिप्समुळे पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे. 

याआधी नवाब मलिकांनी के पी गोसावींचे व्हॉट्सअॅप चॅट्स उघड केले आहेत. नवाब मलिकांच्या या नव्या खळबळजनक गौप्यस्फोटानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी के पी गोसावी च्या ४ ऑडिओ क्लिप्स ट्विटरवरून पोस्ट केल्या आहेत. 

पहिली क्लिप 

के पी गोसावी - जस्ट कलेक्ट द डेटा अलोंग विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स, इसके बाद में आपण मोबाईल से ही ट्रेस करलेंगे! कोई दिक्कत नाही हैं. बट डोन्ट डिस्कस अपार्ट फ्रॉम मी बिकॉज आय एम डायरेक्टली टू द ऑफिशियल   

दुसरी क्लिप 

के पी गोसावी - कबीर का.... कबीर के पास कन्फर्म होगा क्या! मुझे कन्फर्म जिनके पास होगा १० मे से ५ तोभी कन्फर्म चाहिए आ, उनके पास निकलना चाहिए.  

तिसरी क्लिप 

के पी गोसावी - दादा! दिल्ली का मेसेज डालना है तो अभी डाल दो हां! बाद मे दिल्ली बंद हो जायेगा फार कल तक चला जायेगा. 

चौथी क्लिप 

के पी गोसावी - भाई जाने दे अभी सब लोक थक गये हैं! पुरा स्टाफ थक गया हैं और मै भी कल से सोया नाही हूं! मेरी भी हालत खराब हैं एव्हरीबडी इज टायर्ड  

मुंबईतील समुद्रात आयोजित क्रूझ पार्टीवर कारवाई करण्यासंदर्भातील काही चॅट्स आणि ऑडिओ क्लिप नवाब मलिक यांनी उघड केले आहेत. यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये के पी गोसावी हा ऑफिशियल असा उल्लेख करत असल्याचं समोर आलं आहे. क्रूझवरील पार्टीत ठराविक व्यक्तींनाच टार्गेट करण्यासंदर्भात के पी गोसावी एका व्यक्तीसोबत चॅट्सवर बोलत असल्याचं दिसून येत आहे. "केपी गोसावी आणि माहिती देणारा व्यक्ती कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचं प्लानिंग करत असल्याचं या व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड होत आहे. तर के पी गोसावी हा एनसीबी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं अज्ञात व्यक्तीला सांगत असल्याचं ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. या ४ ऑडिओ क्लिपबाबत नवाब मलिक यांनी माहिती देत के पी गोसावीचे हे संभाषण असल्याचं नमूद केले आहे. 

 

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपTwitterट्विटरPoliceपोलिस