शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘बदनाम गँग’, प्रसिद्धीसाठी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 19:23 IST

Crime News : आरोपींनी खुनाची घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोपींचा कट होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बदनाम गँगच्या नावाने आपली टोळी तयार करून प्रसिद्ध होण्यासाठी एका व्यक्तीची हत्या करणाऱ्या अशा तीन अल्पवयीन मुलांना दिल्लीपोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी खुनाची घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोपींचा कट होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ अपलोड करण्यामागे परिसरात त्याच्या नावाचा दरारा निर्माण करणं एवढाच नव्हता तर त्यांच्या टोळीची 'बदनाम गँग' ओळखून भीती निर्माण करणे हा असेल. चौकशीदरम्यान असे समजले आहे की, पुष्पा चित्रपट आणि भौकाल ही वेब सिरीज पाहून अल्पवयीन मुलांना ही कल्पना सुचली होती.काय आहे संपूर्ण प्रकरण ?  १९ जानेवारी रोजी जहांगीर पुरी पोलिस स्टेशनला फोन आला की, एका व्यक्तीला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. शिबू असे मृताचे नाव आहे.तपासादरम्यान शिबूचे कोणाशीही शत्रुत्व नसून ही हत्या लुटण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलिसांना समोर आले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, दिल्ली पोलिसांना शिबूसोबत तीन मुले भांडण करताना आणि मारहाण करताना दिसत होते.यानंतर पोलिसांनी तिघांचीही ओळख पटवली आणि नंतर त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत पोलिसांना समजले की, तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत, त्यामुळे पोलीस याप्रकरणी बाल न्याय मंडळाच्या नियमानुसार कारवाई करत आहेत, पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे समोर केले.पुष्पा चित्रपट पाहिल्यानंतर गँग तयार झालीप्रथमत: तिघांचे पीडितेसोबत कोणतेही वैर नसल्याचे पोलिसांना समजले. आरोपीने गेल्या काही दिवसांपूर्वी पुष्पा हा चित्रपट तसेच भौकाल ही वेबसिरीज पाहिली होती. यानंतर स्वत:ची टोळी तयार करून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते.यानंतर तिघांनीही आपापली टोळी तयार केली, ज्याला त्यांनी 'बदनाम गँग' असे नाव दिले. १९ तारखेला त्याने शिबूची चाकूने हत्या केली आणि त्याच्या एका साथीदाराने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला जाईल, जेणेकरून लोक त्यांना आणि त्यांच्या टोळीबाबत दरारा निर्माण होऊन घाबरतील, असा त्यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांचा डाव यशस्वी होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी त्यांना पकडले. या संपूर्ण घटनेची नोंद असलेला मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीDeathमृत्यू