शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सहा महिन्यांनंतर बलात्कार उघड, पॉक्सोच्या गुन्ह्यात आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:25 IST

बलात्कार करणाऱ्या नराधमाला समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

ठळक मुद्देही मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे घरच्यांना समजल्यानंतर ही बाब उघड झाली. जेवण बनविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक

मुंबई - जेवण बनविण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ही मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे घरच्यांना समजल्यानंतर ही बाब उघड झाली.अमित रॉय उर्फ बमबम (२३) असे अटक तरुणाचे नाव असून कांदिवली पूर्वच्या पोईसरमध्ये तो राहतो. १३ वर्षांची पीडित मुलगी शोभा (नावात बदल) हीदेखील त्याच परिसरात राहते. रॉयने गोड बोलून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर ‘मला भाजी बनवून दे, मला तुझ्या हातची भाजी आवडते,’ असे सांगत तो तिला घरी बोलवायचा. याच दरम्यान त्याने अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला दिवस गेले. शोभाच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिच्या घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. तेव्हा ती सहा महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले.शोभा अल्पवयीन असल्याने रुग्णालयाने याची माहिती समतानगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोभाचा आणि घरच्यांचा जबाब नोंदवला. तेव्हा तिने रॉयबाबत सांगितले. त्यानुसार रॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तर शोभावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारArrestअटकPoliceपोलिस