जमशेदपूर - झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यातील आदित्यपूर येथे एका विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा अश्लील MMS बनविल्याच्या आरोपाखाली स्थानिक भाजप नेत्याच्या मुलाला पोलिसांनीअटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव आकाश मुखी आहे. आकाश हा भाजप नेते आरआईटी मंडळाचे मंत्री विनोद मुखी यांचा मुलगा आहे. बलात्कारानंतर आकाश अश्लील MMS च्या आधारे पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होता, असा आरोप केला जात आहे.शनिवारी आकाशने एका विवाहित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील MMS बनविल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला एका खासगी गृहनिर्माण सोसायटीत साफसफाई करून उदरनिर्वाह करते आणि तिचा नवरा शहराबाहेर राहतो.आरआईटी पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रीनिवास सिंह म्हणाले की, पीडित महिलेने पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आकाशला रविवारी अटक केली. सोमवारी, पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बलात्कार करून बनवला अश्लील MMS, भाजपा नेत्याच्या मुलाचे दुष्कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 14:00 IST
बलात्कारानंतर आकाश अश्लील MMS च्या आधारे पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होता, असा आरोप केला जात आहे.
बलात्कार करून बनवला अश्लील MMS, भाजपा नेत्याच्या मुलाचे दुष्कृत्य
ठळक मुद्देआकाश हा भाजप नेते आरआईटी मंडळाचे मंत्री विनोद मुखी यांचा मुलगा आहे. ही महिला एका खासगी गृहनिर्माण सोसायटीत साफसफाई करून उदरनिर्वाह करते आणि तिचा नवरा शहराबाहेर राहतो.शनिवारी आकाशने एका विवाहित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर बलात्कार केला