शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेल्याने तरुणाने वरळी सी लिंकवरून घेतली समुद्रात उड़ी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 21:52 IST

Suicide Attempt : दुसरीकडे जेट्टी पर्यंत मोबाईल व्हँन पोहचत नसल्याने तरुणाला दुचाकीवर मध्यभागी बसवत रुग्णालयात दाखल केल्यामुळे तरुणाचे प्राण वाचल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देसी लिंक कर्मचारी आणि पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राणयाप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : कोरोनाच्या काळात नोकरी सुटली.  अशात बेरोजगारीतून तरुणाने वरळी लिंकवरून समुद्रात उड़ी घेतली. सी लिंकच्या कर्मचाऱ्यानी तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली. वरळी पोलिसांनी त्याच्या बचावासाठी पावले उचलली. दुसरीकडे जेट्टीपर्यंत मोबाईल व्हँन पोहचत नसल्याने तरुणाला दुचाकीवर मध्यभागी बसवत रुग्णालयात दाखल केल्यामुळे तरुणाचे प्राण वाचल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वरळी पोलिसांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास एका तरुणाने वरळी सी-लिंक वरून समुद्रात उड़ी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच, वरळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी  समुद्राकडे धाव घेतली. तेव्हा एक तरुण  पाण्यामध्ये गटांगळ्या घेत असल्याचे दिसत असताना सी-लिंकचे सुपरवायझर चेतन कदम आणि कर्मचारी विवेक सावंत हे वरळी कोळीवाडा जेट्टी मार्गाने सि-लिंक ब्रिजखालून घटनास्थळी पोहोचले. आणि खड़कात अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले. तोच वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल कोळी यांनी त्यांच्या दिशेने पोर्टेबल स्ट्रेचर फेकला. त्याच स्ट्रेचर वरून तरुणाला जेट्टी पर्यंत आणले.            

जेट्टीवर पोलिसांकड़ून त्याच्यावर प्राथमोपचार करण्यात आले. दुसरीकडे जेट्टीपर्यंत मोबाइल व्हँन पोहचत नसल्यामुळे कदम आणि सावंत यांनी दुचाकीच्या मध्यभागी तरुणाला बसवत पोद्दार रुग्णालयात दाखल केले. तरुणाला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले.       

तेथून पुढील उपचारासाठी तरुणाला नायर रुग्णालयात हलवले. त्याच्याकडील मोबाईल मधून पोलिसांनी त्याच्या आईशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. पुढे आलेल्या चौकशीत, त्याचे नाव राहुल हिरन गटीया (३२) असून तो वाळकेश्वरचा रहिवासी आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या राहुलची कोरोनामुळे नोकरी गेली. घरातील एकुलता एक मुलगा असल्याने तो बेरोजगारीमुळे नैराश्येत होता. सोमवारी दुपारी भायखळा वरून वांद्रेकड़े जाण्यासाठी तो टॅक्सीने वरळी सी लिंकवर पोहचला. तेथे टॅक्सी थांबवून त्याने पाण्यात उड़ी घेतल्याचे कोळी यांनी सांगितले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंक