शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! आईवडिलांची हत्या करून पुरले घरातच, ७ दिवस तिथेच जेवला अन् झोपलाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 21:21 IST

Double Murder Case : काही दिवसांनंतर जेव्हा विधी संघर्ष बालकाचा थोरला भाऊ घरी आला तेव्हा या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला.

अंबिकापुर/उदयपूर - छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पोलिसांनाही देखील धक्का बसला. येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्याच आई-वडिलांची हत्या केली. एवढेच नव्हे तर त्याने दोघांचे मृतदेह घरातच पुरले. तब्बल एक आठवड्यापर्यंत तो मृतदेह पुरलेल्या घरात बसून जेवत होता आणि झोपत होता. काही दिवसांनंतर जेव्हा विधी संघर्ष बालकाचा थोरला भाऊ घरी आला तेव्हा या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला.

आईला वाचवण्यासाठी मुलाने लावली जीवाची बाजी, ना स्वतः वाचला, ना आईला वाचवता आले

हे धक्कादायक दुहेरी हत्याकांड प्रकरण सरगुजा जिल्ह्यातील उदयपूर भागातील खोधला गावातील आहे. जयराम सिंह (50) आणि फूलसुंदरी बाई (45) आपल्या लहान मुलासह राहत होते. तर त्यांचा थोरला मुलगा हेमंत जवळील गावात आपल्या सासरी राहतो. अल्पवयीन मुलाने 28 फेब्रुवारी रात्री आई-वडील घरात झोपलेले असताना धारदार शस्त्राने त्यांनी हत्या केली. नंतर त्याने घरात खड्डा खणला आणि वडिलांचा मृतदेह घरातच पुरला. दोन दिवसांनंतर आईचा मृतदेह पुरल्यानंतर आरोपीने घरातील रक्ताचे डाग स्वच्छ केले. भयानक गोधत म्हणजे आरोपीने ज्या खोलीत आई-वडिलांचा मृतदेह पुरला होता, त्याच खोलीत तो दररोज स्वयंपाक करून खात होता आणि पुरलेल्या ठिकाणी झोपत होता.

खळबळजनक! पतीने केले क्रूर कृत्य, पत्नीची हत्या करून मृतदेह पुरला बाथरूममध्ये पुरला

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या

आठवड्याने लहान मुलाचा थोरला भाऊ घरी पोहोचला. घरी आई-बाबा नव्हते. जेव्हा तो घरी आला तेव्हा दुर्गंध येत असल्यानं तो घाबरला. यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने स्वत:चा गुन्हा कबुल करीत सर्व हकीकत सांगितली. यानंतर पोलिसांच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने खड्डा खणला आणि दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राथमिक तपासात विधी संघर्ष बालक मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचं समोर आलं. आई-वडील त्याची नीट काळजी घेत नव्हते, म्हणून त्यांनी दोघांची हत्या केल्याचं आरोपीने सांगितलं. तसेच थोरल्या भावाने सांगितलं की, आरोपी खूप रागीट आहे. तो नेहमी आई-वडिलांवर चीड चीड करीत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटक