इंदूरनंतर चेन्नई, मंदिरात पूजा सुरु असताना पाच मुलांचा टाकीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:54 IST2023-04-05T13:54:24+5:302023-04-05T13:54:51+5:30
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली होती.

इंदूरनंतर चेन्नई, मंदिरात पूजा सुरु असताना पाच मुलांचा टाकीत बुडून मृत्यू
राम नवमीच्या दिवशी मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून ३७ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना चेन्नईतही दु:खद घटना घडली आहे. पुजा सुरु असताना मंदिराच्या टाकीमध्ये पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी पाच मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मंदिरात पुजा सुरु असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली होती. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने ४० हून अधिक लोक आत पडले होते. यापैकी काहींना वाचविण्यात आले होते.