शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गोडीगुलाबीने शेतात घेऊन गेला अन् शरीरसुखाचा आनंद घेतला; त्यानंतर पत्नीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:24 IST

महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

नवी दिल्ली: गोडीगुलाबीने आरोपी पीडित महिलेला जवळच्या शेतात घेऊन गेला. त्यानंतर तिथे आरोपीने पीडितमहिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित महिलेच्याच ओढणीने तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर ओरोपी पतीने २५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. रविवारी शेतात मृतदेह सापडल्यानंतर हत्येचा हा गुन्हा उघडकीस आला. महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

मला पीडित पत्नीसोबत संसार करायचा होता. पण माझ्या घरी नांदण्यास ती आणि तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यामुळे मी पत्नीच्या हत्येचे कारस्थान रचले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. आरोपी कानपूर देहात जिल्ह्यातील नासीरपूर गावचा राहणारा आहे.  पत्नी हमीरपूरला तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. दोघांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून, त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. 

आरोपी आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी सतत पीडित महिलेचा छळ करायचे. त्यामुळे सततच्या या भांडणाला कंटाळून ती तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली. दोन फेब्रुवारीपासून पीडित महिला बेपत्ता होती. तीन फेब्रुवारीला पीडित महिलेच्या आई-वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांशी बोलताना, जावयावर संशय व्यक्त केला होता.

आरोपीने पैसे देण्याच्या बहाण्याने पीडित पत्नीला हमीरपूरमध्येच बाहेर भेटायला बोलावले. पीडित महिला भेटल्यानंतर तो तिला गोडीगुलाबीने जवळच्या शेतात घेऊन गेला, तिथे त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित महिलेच्याच ओढणीने तिची गळा आवळून हत्या केली. तिचा मृतदेह कोणाच्या नजरेस पडणार नाही, अशी पद्धतीने शेतामध्ये लपवला. त्यानंतर आरोपीने तिचा मोबाइल फोन नदीत फेकून दिला होता, असं संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Murderखूनsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणUttar Pradeshउत्तर प्रदेश