शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीनंतर नोएडातील रस्त्यावरही निर्दयीपणाचा कळस, तरुणीला गाडीनं चिरडलं अन् ओळख पटू नये म्हणून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:54 IST

मृत तरुणीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. तिची ओळख पटण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच तिचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दिल्लीत एका तरुणीला कारने 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घढल्यानंतर, आता ग्रेटर नोएडामधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा ईस्टर्न पेरीफेरल हाईवेवर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ओळख पटू नये यासाठी या तरुणीचे डोकेही टायरणे चिरडण्यात आले आहे. या मृतदेहाजवळ कुठलेही वाहन आढळून आलेले नाही. या प्रकरणी, हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

दादरी पोलिसठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी एका तरुणीचा मृदतेह ईस्टर्न पॅरिफेरल एक्सप्रेस वेवर आढळून आला आहे. तिचे डोके देखील वाहनाने चिरडले गेले आहे. महत्वाचे म्हणजे, या तरुणीची दुसऱ्या कुठल्या ठिकाणी हत्याकरून तिचा मृतदेह येथे फेकण्यात आल्याचा अंदाज आहे. 

याप्रकरणी पोलीस विविध कंगोऱ्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मृत तरुणीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. तिची ओळख पटण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच तिचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, येथून काही अंतरावर दिल्लीत एका तरुणीची तब्बल 12 किलोमिटरपर्यंत फरफटत नेऊन हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असतानाच, नोएडातून ही घटनाही समोर आली आहे.  शनिवारी रात्रीच्या सुमारास सुल्तानपुरी भागात कारने स्कूटीवरील एका मुलीला धडक दिली. मुरथलवरून पार्टी करून परतणाऱ्या पाच जणांनी कार थांबवली नाही आणि 12 किलोमिटरपर्यंत संबंधित मुलीला फरफटत नेले. यानंतर ते तरुणीचा मृतदेह कंझावलातील जौंती गावात टाकून फरार झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश