शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् दहशतवादी कमालचा किस्सा खतम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:44 IST

Terrorist Kamal Died due to corona : मुंबईत ११ मिनिटांत सात स्फोट; १८९ जणांचे बळी अन् ८२४ जखमी

ठळक मुद्देसहा वर्षांपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या कमालवर कोरोनाने घाव घातला अन् सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

नरेश डोंगरे 

नागपूर : मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवून १८९ जणांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी कमाल अहमद अंसारीने नंतर आपल्या जावयाला फोन करून ही माहिती कळविली. तोच धागा पकडून एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या अन् त्याला फाशी यार्डमध्ये पोहचवले. येथे सहा वर्षांपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या कमालवर कोरोनाने घाव घातला अन् सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

गेल्या नऊ दिवसांपासून मेडिकलमध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेला दहशतवादी कमाल अंसारी (५०) याचा सोमवारी पहाटे १ च्या सुमारास मृत्यू झाल्याने अंगावर शहारे आणणाऱ्या मुंबईस्फोट मालिकेच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेला आल्या. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी ११ जुलै २००६ ला मुंबईच नव्हे, तर देश हादरवला होता. सायंकाळच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये अवघ्या ११ मिनिटांत सात बॉम्बस्फोट घडवून त्यांनी १८९ जणांचे बळी घेतले, तर ८२४ प्रवाशांना जीवघेण्या जखमा दिल्या होत्या. या स्फोटाचा तपास त्यावेळी मुंबई पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सुरू केला. तपासासाठी सात पथके नेमली. रॉ तसेच सीबीआयचीही मदत घेण्यात आली होती. तपास पथकांनी सुमारे ४०० जण ताब्यात घेतले. एका प्रेशर कूकर विक्रेत्याने आरोपींचा धागा दिला. त्यानंतर १८ ते २० जुलैला बिहारचा रहिवासी कमाल अहमद अंसारी याच्या तपास पथकाने मुसक्या आवळल्या. साखळी स्फोटाच्या थराराची कथा कमालने त्याचा जावई मुमताज चाैधरीला फोन करून ऐकवली होती. हे टेलिफोनवरील संभाषण हाती लागल्यानेच कमालच्या मुसक्या आवळल्या अन् नंतर एका पाठोपाठ १३ जणांना अटक करण्यात आली. त्यात इंडियन मुजाहिदीनचे काही दहशतवादीही होते.

जिहादच्या नावाने ब्रेन वॉश केल्यानंतर मूळचा बिहारचा रहिवासी असलेला कमाल अहमद अंसारी सैतानच बनला होता. त्यानेच आपल्या साथीदारांच्या माध्यमातून मुंबईच्या जीवनवाहिनीत मृत्यूचे तांडव घडवल्याचे तपास पथकाला सांगितले होते. पुढे मोक्का न्यायालयाने २०१५ मध्ये १३ आरोपींपैकी कमाल अंसारीसह पाच जणांना फाशी, तर सात जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. 

२०१५ पासून नागपुरातफाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने कमाल अंसारी याला २०१५ मध्येच मुंबईतून नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हलविवण्यात आले होते. तेव्हापासून तो येथेच होता. त्याला कधी फासावर टांगले जाईल, याबाबत कुणाकडेच माहिती नव्हती. मात्र, कोरोनाने त्याला ९ एप्रिलला विळखा घातला अन् अवघ्या नऊ दिवसांत त्याच्याभोवतीचा पाश घट्ट करीत सोमवारी त्याचा किस्सा खतम केला.

टॅग्स :terroristदहशतवादीBlastस्फोटMumbaiमुंबईnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगIndian Mujahideenइंडियन मुजाहिदीन