शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतून काढल्याने मुलाने शिक्षकावर गोळी झाडली, नेमके झाले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:59 IST

Crime News: सरकारी शाळेतून काढून टाकल्यामुळे अस्वस्थ झालेल्या बारावी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षक नटवर यादव (४५) यांच्यावर गोळी झाडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार येथील कोटपुतली तहसीलमध्ये नारेदा भागाजवळ घडला.

जयपूर : सरकारी शाळेतून काढून टाकल्यामुळे अस्वस्थ झालेल्या बारावी वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षक नटवर यादव (४५) यांच्यावर गोळी झाडली. गुरुवारी दुपारी हा प्रकार येथील कोटपुतली तहसीलमध्ये नारेदा भागाजवळ घडला. बराच रक्तस्राव झाल्यामुळे यादव यांना आधी स्थानिक रुग्णालयात व नंतर विशेष उपचारांसाठी येथील एसएमएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.हा विद्यार्थी शिक्षकांशी नेहमी भांडायचा म्हणून गेल्या वर्षी त्याला शाळा सोडल्याचा दाखला शिक्षकाने दिला होता. नारेदात रस्त्याने यादव दुचाकीने घरी जात असताना दोन अल्पवयीन युवकांनी त्यांना अडवले व त्यातील एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. हरयाणातील या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.”  आरोपी मुलाचे शिक्षकांशी नेहमी भांडण व्हायचे. शाळा सोडल्यानंतर तो राजसमंद जिल्ह्यात काम करण्यासाठी गेला. तेथे त्याचे सगळे मित्र बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. त्याला राग आला व त्याने शिक्षक यादव यांना धडा शिकवण्याचे ठरवले.  

नेमके झाले काय?मुलाने यादव यांना गुणपत्रिका मागितली होती. त्यांनी त्याला खडसावले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. नंतर त्याने त्यांच्यावर गोळी झाडली. यादव हे १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवतात. या विद्यार्थ्याला शाळेतून का काढून टाकले याचा तपशील यादव यांना विचारल्यावर ते वेदनांमुळे काही सांगू शकले नाहीत.

टॅग्स :FiringगोळीबारRajasthanराजस्थानStudentविद्यार्थीSchoolशाळा