शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:34 IST

Dowry Case :नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे.

हाजीपूर- बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये हुंड्यासाठी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे. विजया कुमारी उर्फ ​​निधी कुमारी यांचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला वैशालीच्या लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रौडी पोखर गावातील बबन सिंह यांनी आपली मुलगी विजया कुमारी उर्फ ​​निधी कुमारी हिचा विवाह सराई पोलीस स्टेशन हद्दीतील शंभूपूर कोअरी गावातील रहिवासी रणवीर सिंहसोबत केला होता. लग्नात भेट म्हणून पाच लाख रोख, दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ९४ हजार पाचशे रुपये किमतीची मोटारसायकल आणि सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे घरगुती साहित्य दिले. मात्र, विजयासोबतच तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी चारचाकी (कार) साठी तिला मारहाण व छळ करण्यास सुरुवात केली.पीडित मुलगी तिच्या आईला फोनवरून छळाची माहिती देत ​​असे. मृताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन आला. मुलीचे संपूर्ण कुटुंब तात्काळ  मुलीच्या घरी पोहोचले, तेव्हा विजयाचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तिच्या मानेवर खोलवर खुणा होत्या. त्याचवेळी मुलीचे सासरचे लोक घर सोडून फरार झाले आहेत. विजयाच्या वडिलांनी माहिती दिल्यानंतर, सराई पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि तिचा मृतदेह त्यांच्या ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी हाजीपूर सदर रुग्णालयात पाठवला.नवविवाहित मुलीच्या हत्येनंतर तिच्या घरात हाहाकार माजला आहे. बबन सिंग यांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप करत सराई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचे सराई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणाले.

टॅग्स :dowryहुंडाBiharबिहारPoliceपोलिसcarकारmarriageलग्न