शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या ८ वर्षांनी बायकोला समजलं नवऱ्याचं रहस्य; ऐकून पायाखालची जमीन सरकली, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 13:22 IST

लग्नानंतर पती विराजसोबत हनीमूनसाठी आम्ही काश्मीरला गेलो. त्याठिकाणी विराज पत्नीशी जवळीक साधण्यासाठी स्वारस्य दाखवत नव्हता.

गुजरातच्या वडोदरा इथं असं प्रकरण समोर आलंय जे ऐकून कुणीही हैराण होईल. याठिकाणी लग्नाच्या तब्बल ८ वर्षानंतर पत्नीसमोर पतीचं एक सीक्रेट उघड झालं ज्यानं पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेला सत्य समजल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. 

या घटनेबाबत पत्नी शीतलनं(बदललेलं नाव) सांगितले की, माझ्या पहिल्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. माझी १४ वर्षांची मुलगी होती. त्यामुळे मी दुसरं लग्न करण्याचं ठरवलं. जवळपास ९ वर्षापूर्वी तिची ओळख मेट्रोमोनियल साइटवरून विराज वर्धन नावाच्या व्यक्तीसोबत झाली. आम्ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आलो. चांगली ओळख झाल्यानंतर आम्ही लग्न करण्याचं ठरवलं. २०१४ मध्ये कुटुंबाच्या परवानगीने आम्ही लग्नाच्या बंधनात अडकलो असं तिने म्हटलं. 

लग्नानंतर पती विराजसोबत हनीमूनसाठी आम्ही काश्मीरला गेलो. त्याठिकाणी विराज पत्नीशी जवळीक साधण्यासाठी स्वारस्य दाखवत नव्हता. अनेक दिवस आम्ही एकमेकांशी शारिरीक संबंध ठेवले नाहीत. जेव्हाही शीतलनं विराजवर शारिरीक संबंधांसाठी दबाव टाकला तेव्हा विराजनं बहाणा करुन तिला टाळणं सुरू केले. काही वर्षापूर्वी रशियात झालेल्या एका दुर्घटनेमुळे मी लैंगिक संबंध बनवण्यात असमर्थ असल्याचं विराजनं शीतलला सांगितले. 

जबरदस्तीने ठेवले अनैसर्गिक लैंगिक संबंधशीतलनं आरोप केला की, २०२० मध्ये विराज वजन वाढल्याचा बहाणा करत बेरियाट्रिक सर्जरीसाठी कोलकाताला गेला होता. कोलकात्यात जाऊन विराजने पुरुषांच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया केली असा दावा तिने केला. कोलकाताहून परत येऊन विराजने शीतलसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि याबाबत कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. शीतलला विराजचे वास्तव समजताच तिने पोलिसांत बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.