शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आफताबची पॉलिग्राफ चाचणी सुरु; बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 08:59 IST

आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत.

मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची प्रकृती ठीक नसल्याने रखडलेली पॉलिग्राफ चाचणी गुरुवारी पार पडली. मात्र, त्याला सर्दी झाल्याने, सतत शिंका येत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही.  ती शुक्रवारी पुढे सुरु राहिली. कदाचित उद्याही ही चाचणी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चाचणीत आफताबने त्याच्या आणि श्रद्धाच्या संबंधांबाबत थोडी परस्परविरोधी माहिती दिल्याने सोमवारच्या चाचणीतील त्याच्या उत्तराकडे लक्ष लागले आहे. आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी गोळा केलेले पुरावे, त्याने श्रद्धाचा खून केला कसा, का केला, कशासाठी केला, दोघांच्या नात्यात नेमके काय घडले होते, त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, त्यासाठी कोणती अवजारे वापरली, मृतदेहाचे तुकडे-तिचा मोबाइल कुठे फेकला, हत्येनंतरही काळ काळ सोशल मीडियावर ती जिवंत असल्याचे कसे भासवले, यावर आधारित जवळपास ५० प्रश्न या टीमने काढले आहेत. त्यातील २० - २२ प्रश्न गुरुवारी विचारले. उरलेले प्रश्न सोमवारी विचारले जातील. या चाचणीच्या वेळी आफताबने शांतपणे उत्तरे दिली. त्याच्यावर कोणताही ताण नव्हता, तो शांतपणे चाचणीला सामोरा गेला. 

बद्रीही संशयाच्या भोवऱ्यातछत्तरपूर पहाडीच्या जंगलात आडबाजूला आफताबला घर भाड्याने देणारा त्याचा मित्र बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. याच घराजवळच्या जंगलाच्या भागात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते. आफताब आणि श्रद्धाची हिमाचल प्रदेशात ब्रदीशी ओळख झाली होती. त्यानंतर ब्रदीने आफताबला घर भाड्याने दिले होते. त्याला हत्येची कल्पना होती, त्याचा सहभाग आहे का याबाबत चौकशी होणार आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस