शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा हत्याकांड : आफताब शरीराचे तुकडे करून फेकून देईल; श्रद्धाने पोलिसांकडे व्यक्त केली होती भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 06:51 IST

Shraddha Walker Murder Case : "आफताब मारहाण करीत असल्याची तसेच मला ठार मारणार असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आहे. आज त्याने मला गुदमरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला ठार करेल आणि जागोजागी कापून फेकून देईन."

नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवे खुलासे होत आहेत. श्रद्धाने स्वहस्ते लिहिलेली पोलिस तक्रारीची प्रत बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. नोव्हेंबर २०२० मध्ये तुळींज पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये ‘आफताब आपणास सहा महिन्यांपासून मारहाण करीत असून, त्याने आपल्या शरीराचे तुकडे करून फेकून देईन,’ अशी धमकी दिली असल्याचे नमूद आहे.

या पत्रानुसार, आफताब मारहाण करीत असल्याची तसेच मला ठार मारणार असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आहे. आज त्याने मला गुदमरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तो मला घाबरवतो आणि ब्लॅकमेल करतो. तो मला ठार करेल आणि जागोजागी कापून फेकून देईन, दोन वर्षांनी तिने व्यक्त केलेली ही भीती तंतोतंत खरी ठरली आहे.  

नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला आफताबने एव्हरशाईन - वसई येथे राहत असताना गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी अर्ज देण्यास सांगून मेडिकल करून येण्यास सांगितले होते. पण, तिने याकडे कानाडोळा केला.

तिच्या तक्रारीवर तुळींज पोलिसांनी चौकशी केलेली आहे. चौकशीदरम्यान आपली कोणतीही तक्रार नसून मी दिलेली तक्रार मागे घेत आहे. आपली तक्रार नसल्याचे स्टेटमेंट तिने पोलिस ठाण्यात दिले होते. - सुहास बावचे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-३

पत्रावर कारवाई का झाली नाही याचा तपास होणार : फडणवीस- श्रद्धा वालकर हिने २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी भाष्य केले. - श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र