शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 18:42 IST

उद्या या दोघांना सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देयापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या दोघांना मुंबईतून सीबीआयने अटक केली आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक

मुंबई -  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.मात्र, या दोघांचा या हत्याकांडात काय सहभाग आहे हे अद्याप समजू शाळेला नाही. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली आहे. उद्या या दोघांना सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.

सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला होता. यापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी बेंगलोर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने दाभोलकर यांचेवर गोळ््या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता.डॉ. वीरेंद्रसिंग तावडे यांच्या सोबतीने इतर आरोपींनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी मोटारसायकलवरून आलेले दोन हल्लेखोर अंदुरे आणि कळसकरच होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. २० आॅगस्ट २०१३ रोजी (घटनेच्या दिवशी) ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वासात वाजण्यापूर्वी त्याठिकाणी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर नेमके कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचे उघडकीस आले. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ््या झाडण्यात आल्या आहेत, असे शरद कळसकरकडे केलेल्या चौकशीत समोर आले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तूलांची विल्हेवाट लावल्याचा दावा ही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात लवकरच अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

  

 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरArrestअटकCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबईMurderखूनGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेश