लोणावळा : पर्यटनस्थळे बंद असताना देखील लोणावळ्यात फिरायला आलेल्या तब्बल 69 पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवार व रविवारी विशेष कारवाई मोहिम राबवत गुन्हे दाखल करण्यात आलेे आहे. मास्क न लावता फिरणार्या 44 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता शासन स्तरावरून वारंवार सुचना दिल्या जात असताना काही नागरिक या सूचनांकडे कानाडोळा करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या सोबत मावळ तालुक्यातील 31 ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. लोणावळा व खंडाळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे बंद असताना काही पर्यटक शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात येत आहेत. मागील तिन आठवडे सातत्याने विशेष मोहिम राबवत नाकाबंदी करत पोलीस प्रशासन कारवाई मोहिम राबवत आहे. शेकडो जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी देखिल पर्यटकांचा उन्माद पहायला मिळत आहेत.
प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 21:05 IST
प्रशासनाकडून वारंवार बाहेर न पडण्याचे आवाहन करून देखील शनिवारी व रविवारी लोणावळ्यात पर्यटनाला आले होते.
प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल
ठळक मुद्देमास्क न लावणार्या 44 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड