शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पब्जीच्या नादानं आयुष्याचा 'खेळ'; पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्यायल्यानं तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 21:51 IST

सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते.

ठळक मुद्देसंतोष शर्मा याचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. त्यामुळे  दागिने साफ करण्यासाठी अ‍ॅसिडची गरज लागते म्हणून त्याने बागेतून अ‍ॅसिडची बाटली घेतली होती. सौरभच्या कुटुंबाने संतोष शर्मावर जाणूनबुजून अ‍ॅसिड पाजल्याचा आरोप केला आहे. 

मध्य प्रदेश - पबजी गेम खेळण्याच्या नादात एक २० वर्षीय तरुण पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला. मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ट्रेन प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली. याबाबत माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.संतोष शर्मा याचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. त्यामुळे  दागिने साफ करण्यासाठी अ‍ॅसिडची गरज लागते म्हणून त्याने बागेतून अ‍ॅसिडची बाटली घेतली होती. ट्रेनमध्ये ग्वाल्हेर येथे राहणाऱ्या सौरभ यादव हा गेम खेळण्यात गुंग झाला होता. त्याने कानाला हेडफोन्स लावले होते. सौरभला तहान लागलेली होती त्यावेळी त्याने खेळण्याच्या नादात शर्माच्या बॅगेतून अ‍ॅसिडची बाटली काढली आणि पाणी समजून तो अ‍ॅसिड प्राशन केले. जास्त प्रमाणात अ‍ॅसिड पोटात गेल्याने आणि ताबडतोब वैद्यकीय उपचार न मिळाल्याने सौरभच्या मृत्यू झाला. 

ट्रेन ढोलपूर येथे थांबत नसल्यामुळे सौरभला वेळेत योग्य उपचार मिळू शकले नाहीत. ट्रेन आग्र्याला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. शर्माने आपण ज्वेलर्स असून आग्र्याच्या सराफा बाजारमध्ये आपले नेहमी येणे - जाणे सुरु असते असे पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सौरभच्या कुटुंबाने संतोष शर्मावर जाणूनबुजून अ‍ॅसिड पाजल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमDeathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस