शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विमा पॉलिसीचे पैसे मिळून देण्याच्या बहाण्याने २६ लाखांची फसवणूक दिल्लीतुन अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 14:11 IST

आरोपीला दिल्लीतुन अटक..

पुणे : हप्ता न भरल्याने बंद पडलेल्या विमा पॉलिसी सुरु करून देत असल्याचे बहाण्याने व पॉलीसी मॅचुअर झाल्याने तिची मोठी रक्कम तुम्हाला मिळतील असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला दिल्ली येथे पुणे सायबर टीमकडून अटक  करण्यात आली आहे .     नवी पेठ येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने  २०१६ ते सन २०१८ या दरम्यान वेगवेगळ्या कंपनीच्या विमा पॉलिसी घेतल्या होत्या . त्यांचे हप्ते फिर्यादीने भरले नव्हते. आरोपींनी फिर्यादी यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून ह्यतुमच्या पॉलीसी बजाज सर्व्हिसेस या आमच्या कंपनीने घेतल्या आहेत.  त्या तुम्हाला चालू करता येतील असे खोटे सांगून व त्या साठी काही नवीन पॉलिसी घ्याव्या लागतील असे सांगून तसेच तुमची पॉलीसी मॅचुअर झाल्या आहेत , त्याचे तुम्हाला ८२,९५०००/- रु मिळणार आहेत असे आमिष दाखवून  टॅक्सची रक्कम भरावी लागेल, सर्व्हिस चार्जेस भरावे लागतील , त्याशिवाय तुम्हाला ८२,९५०००/- रु मिळणार नाहीत , तुम्ही आता भरत असणारी रक्कम ही रिफंडेबल आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक अकाउंट्सवर पैसे भरण्यास सांगून त्यांची एकूण २६ लाख ९५ हजार रुपयांची फसवणुक केली होती          या प्रकाराबाबत सायबर पो स्टे पुणे येथे माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन कडील स्टाफकडून त्याबाबत तांत्रिक विश्लेषण करुन यामधील आरोपी नामे शामबाबू किशोरीलाल रा इ-399 , मोतीनगर सुदर्शन पार्क , नवी दिल्ली यास डाबरी , दिल्ली येथे  सापळा रचून दि ०४/१०/२०१९ रोजी दुपारी १२:०० वा च्या सुमारास अटक केली आहे . त्याचेकडून एक मोबाईल फोन  , ०२ सिम कार्डस जप्त करण्यात आले आहे . त्यास द्वारका न्यायालय,  दिल्ली यांनी दि. ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .        ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे , पुणे शहर व पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे , पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित , सपोनि गंगाधर घावटे ,  राजकुमार जाबा, मपोना दिपीका मोहीते,  बाबासो कराळे, शाहरूख शेख यांच्या पथकाने केली आहे.         सोशल नेटवर्किंग साईटवरून अशाप्रकारे स्वत:ची खरी आोळख लपवून गुन्हे करणाऱ्या टोळ्या विशेषत: उत्तर भारतातील राज्यांमध्ये कार्यरत आहेत तरी नागरिकांनी मोहास बळी पडून स्वत:ची फसवणूक करुन घेऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक