शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 4:30 PM

Ananya Pandey Reach to NCB Office : खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 

ठळक मुद्देआज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  (Aryan Khan) क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drug Case) आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या रडारवर आली आहे. आज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 

गुरुवारी म्हणजेच आज  एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले होते. NCBच्या पथकाने अनन्याच्या घरातून काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर अनन्याला NCBने समन्स बजावून आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ती उशिरा म्हणजेच ४. १५ वाजताच्या सुमारास बॅलार्ड पिअर येथील एनसीबी कार्यालयात आपल्या वडिलांसोबत चौकशीसाठी हजर राहिली आहे. 

 

त्या दिवशी क्रूझवरील होती...?रिपोर्टनुसार, ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथितरित्या एनसीबीने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आल्यानं एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. अनन्या ही आर्यनची चांगली मैत्रिण आहे. आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थChunky Pandeyचंकी पांडे