Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 04:30 PM2021-10-21T16:30:53+5:302021-10-21T16:34:06+5:30

Ananya Pandey Reach to NCB Office : खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 

Actress Ananya Pandey along with her father Chunky Pandey reaches to the NCB office | Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल

Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल

Next
ठळक मुद्देआज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  (Aryan Khan) क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drug Case) आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या रडारवर आली आहे. आज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. 

गुरुवारी म्हणजेच आज  एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले होते. NCBच्या पथकाने अनन्याच्या घरातून काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर अनन्याला NCBने समन्स बजावून आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ती उशिरा म्हणजेच ४. १५ वाजताच्या सुमारास बॅलार्ड पिअर येथील एनसीबी कार्यालयात आपल्या वडिलांसोबत चौकशीसाठी हजर राहिली आहे. 

 

त्या दिवशी क्रूझवरील होती...?
रिपोर्टनुसार, ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथितरित्या एनसीबीने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आल्यानं एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. 
अनन्या ही आर्यनची चांगली मैत्रिण आहे. आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे.

Read in English

Web Title: Actress Ananya Pandey along with her father Chunky Pandey reaches to the NCB office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.