Shehnaaz Gill: शहनाज गिलच्या वडिलांवर हल्ला; गोळीबार करून हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 19:42 IST2021-12-27T19:41:56+5:302021-12-27T19:42:27+5:30
Attack on Shehnaaz Gill's father: संतोखसिंग यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. पोलीस या प्रकरणी वेगवेगळ्या नजरेतून तपास करत आहेत. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.

Shehnaaz Gill: शहनाज गिलच्या वडिलांवर हल्ला; गोळीबार करून हल्लेखोर पसार
बिग बॉस 13 फेम आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोष सिंग सुख यांच्यावर दोघांनी गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी संतोख सिंग सुख यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी सुख जंदियाला गुरुजवळील एका ढाब्यावर थांबले होते. त्यावेळी ही घटना घडली.
संतोख सिंग सुख यांनी पोलिसांना सांगितले की, टॉयलेटला जाण्यासाठी गाडी थांबवली होती. त्यानंतर दोन दुचाकीस्वार त्यांच्या कारजवळ आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांच्या कारला चार गोळ्या लागल्या आहेत. संतोखसिंग यांचे सुरक्षारक्षक आल्यावर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून चार पुंगळ्या जप्त केल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
संतोखसिंग यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. पोलीस या प्रकरणी वेगवेगळ्या नजरेतून तपास करत आहेत. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.