शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

फ्लॅटचा दरवाजा तोडून कारवाई, ईडीच्या हाती लागले 28 कोटीचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:11 IST

अर्पिता मुखर्जींच्या फ्लॅटमधून २७.९ कोटींची रोकड, दागिने जप्त

कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अर्पिता मुखर्जी हिच्याशी संबंधित एका अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि २७.९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चटर्जीला शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांची निकटवर्तीय मानले जाते.

चटर्जी हिच्याशी संबंधित बेलघरिया येथील अपार्टमेंटमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. रात्रभर मोजदाद केल्यानंतर ही रक्कम २७.९० कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. ईडीचे पथक आता दागिन्यांचे मूल्य काढत आहे. दागिने किलोंत असल्याचे समजते. ईडीने पाच दिवसांपूर्वी मुखर्जीच्या टाॅलीगंज भागातील अन्य एका सदनिकेतून दागिने आणि विदेशी चलनाशिवाय २१ कोटी रुपयांहून अधिकची रोकड जप्त केली होती. 

फ्लॅटची चावी न मिळाल्याने दरवाजा तोडला

ईडी अधिकाऱ्यांनी बुधवारी दक्षिण कोलकाता आणि राजदांगा तसेच उत्तर कोलकातातील बेलघरिया येथे धाडी टाकल्या होत्या. चौकशीदरम्यान मुखर्जीने या संपत्तीची माहिती दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेलघरियाच्या रथतला भागातील सदनिकांची चावी न मिळाल्याने तपास अधिकाऱ्यांना आत जाण्यासाठी दरवाजा तोडावा लागला. 

झडतीदरम्यान या सदनिकांतून काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बॅनर्जी सरकारमधील दिग्गज मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. अर्पिता मुखर्जीच्या टॉलीगंज येथील सदनिकेत रोकड आढळल्यानंतर ईडीने चटर्जी यांना जेरबंद केले होते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीraidधाड