८ गुन्हे दाखल असलेला अमोल धोत्रेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई!
By रूपेश हेळवे | Updated: August 22, 2023 15:43 IST2023-08-22T15:43:24+5:302023-08-22T15:43:43+5:30
अमोल धोत्रे याला या पूर्वी ही हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. पण तरीही त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नाही.

८ गुन्हे दाखल असलेला अमोल धोत्रेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई!
सोलापूर : पाच वर्षात माढा परिसरात चाकू सारख्या हत्याराने हल्ला करणे, जमाव जमवून दंगा करने, शिवीगाळ करणे असे विविध ८ गुन्हे दाखल असलेला अमोल रोहिदास धोत्रे ( रा. मौजे कुर्डू, माढा) याला एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याची रवानगी येरवाडा कारागृहात करण्यात आली आहे.
अमोल धोत्रे याला या पूर्वी ही हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. पण तरीही त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. यामुळे धोत्रे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जिल्हाधिकार्याकडे सादर केला.
या प्रस्तावाला मान्यता देत जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढले. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी त्याची रवानगी येरवडा कारागृह येथे करण्यात आले आहे. यंदा ही ग्रामीण पोलिसांनी केलेली दुसरी कारवाई आहे. या पूर्वी पोलिसांनी कामती जवळी विरवडे बुद्रुक येथील सद्दाम शेख याला स्थानबद्द करण्यात आले आहे.