कोपरगावात हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर कारवाई
By रोहित टेके | Updated: April 11, 2023 14:03 IST2023-04-11T14:03:42+5:302023-04-11T14:03:57+5:30
अनिल दिलीप कापसे (वय ३४) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोपरगावात हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर कारवाई
रोहित टेके, लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव (जि. अहमदनगर): शहरातील महादेवनगर खड्डा गल्ली येथील राहत्या घराच्या आडोश्याला हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. १०) रात्री कारवाई केली आहे. या कारवाईत २ हजार ५०० रुपये किमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी अनिल दिलीप कापसे (वय ३४, रा. खड्डा गल्ली, महादेवनगर, कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. दरम्यान कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे वाढले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने पोलीस प्रशासनाविषयी सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जाते आहे.