शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
3
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
4
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
6
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
7
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
8
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
9
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
10
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
11
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
13
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
14
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
15
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
16
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
17
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
18
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
19
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
20
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

भिगवण येथे हॉटेलवर सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 7:06 PM

वेश्याव्यवसायातून पश्चिम बंगालमधील दोन मुलींची सुटका

ठळक मुद्देऑनलाईन बिंगो मटका चालक व कल्याण मटका चालकाविरोधात गुन्हा दाखल

बारामती : भिगवण (ता. इंदापूर) येथील हॉटेलवर सुरू असलेला वेश्याव्यवसाय अप्पर पोलीस अधीक्षकांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (दि. १५) उघडकीस आणला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वेश्याव्यवसायातून पश्चिम बंगालमधील दोन मुलींची सुटका करण्यात आली. यावेळी पोलिसांनीभिगवण (ता. इंदापूर)  येथील ऑनलाईन मटक्यावरदेखील कारवाई केली. ऑनलाईन बिंगो मटका चालक व कल्याण मटका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे यासंबंधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. मीना यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवणमधील हॉटेल सत्यजित या ठिकाणी सुरू असलेला अवैध वेश्याव्यवसाय उघड झाला आहे. या प्रकरणी हॉटेल सत्यजित चालविण्यास घेणाऱ्या प्रभाकर शेट्टीसह व्यवस्थापक मनोज मोहिते (रा. ठाणे शहर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मोहिते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी शेट्टी याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईबरोबरच भिगवण बाजारपेठेत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या ऑनलाईन बिंगो व कल्याण मटका चालकावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ५३ हजार रुपयांची रोख रकमेसह १ लाख ६९ हजारांचा अन्य मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक रियाज शेख यांच्यासह सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, सोनाली मोटे यांच्यासह आरसीपी पथकातील १० कर्मचाºयांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :BhigwanभिगवणCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस