बारामती : भिगवण (ता. इंदापूर) येथील हॉटेलवर सुरू असलेला वेश्याव्यवसाय अप्पर पोलीस अधीक्षकांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (दि. १५) उघडकीस आणला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत वेश्याव्यवसायातून पश्चिम बंगालमधील दोन मुलींची सुटका करण्यात आली. यावेळी पोलिसांनीभिगवण (ता. इंदापूर) येथील ऑनलाईन मटक्यावरदेखील कारवाई केली. ऑनलाईन बिंगो मटका चालक व कल्याण मटका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे यासंबंधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. मीना यांनी गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक गुन्हे शाखा व भिगवण पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिगवणमधील हॉटेल सत्यजित या ठिकाणी सुरू असलेला अवैध वेश्याव्यवसाय उघड झाला आहे. या प्रकरणी हॉटेल सत्यजित चालविण्यास घेणाऱ्या प्रभाकर शेट्टीसह व्यवस्थापक मनोज मोहिते (रा. ठाणे शहर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मोहिते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी शेट्टी याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईबरोबरच भिगवण बाजारपेठेत एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या ऑनलाईन बिंगो व कल्याण मटका चालकावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ५३ हजार रुपयांची रोख रकमेसह १ लाख ६९ हजारांचा अन्य मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक रियाज शेख यांच्यासह सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, सोनाली मोटे यांच्यासह आरसीपी पथकातील १० कर्मचाºयांनी सहभाग घेतला.
भिगवण येथे हॉटेलवर सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 19:06 IST
वेश्याव्यवसायातून पश्चिम बंगालमधील दोन मुलींची सुटका
भिगवण येथे हॉटेलवर सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघड
ठळक मुद्देऑनलाईन बिंगो मटका चालक व कल्याण मटका चालकाविरोधात गुन्हा दाखल