घोडबंदर येथील वाळू माफियांवर कारवाई, ५४ ब्रास रेतीसाठा उध्वस्त, ४ सक्शन पंप जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 09:11 PM2021-07-13T21:11:58+5:302021-07-13T21:13:06+5:30

घोडबंदरच्या रेतीबंदर येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने कारवाई केली. ४, सक्शन पंप जप्त करून ५४ ब्रास रेतीसाठा खाडीत टाकून दिला. तर विना स्वामित्वधन गौणखणीज वाहतूक करणाऱ्या २ वाहनांवर करवसी करण्यात आली.

Action against sand mafias at Ghodbunder, 54 brass sand stocks destroyed, 4 suction pumps seized | घोडबंदर येथील वाळू माफियांवर कारवाई, ५४ ब्रास रेतीसाठा उध्वस्त, ४ सक्शन पंप जप्त

घोडबंदर येथील वाळू माफियांवर कारवाई, ५४ ब्रास रेतीसाठा उध्वस्त, ४ सक्शन पंप जप्त

googlenewsNext

मीरारोड - घोडबंदरच्या रेतीबंदर येथे धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने कारवाई केली. ४, सक्शन पंप जप्त करून ५४ ब्रास रेतीसाठा खाडीत टाकून दिला. तर विना स्वामित्वधन गौणखणीज वाहतूक करणाऱ्या २ वाहनांवर करवसी करण्यात आली.

मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अभिजित बोडके, नितीन पिंगळे आदींनी सोमवारी घोडंबंदरच्या रेतीबंदर येथे खाडी किनारी धाड टाकली.  वाळू चोरणारे रवी सॅण्ड, मायकल शेठ, विनोद उपाध्याय व रमन्ना शेट्टी यांच्या असलेल्या सुमारे ५४ ब्रास वाळू साठ्यावर कारवाई करत जेसीबीच्या साहाय्याने वाळू खाडी पात्रात ढकलून दिली. वाळू खेचणारे चार सक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.

या शिवाय मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिल्ली दरबार हॉटेल जवळ विना परवाना रॉयल्टी नसलेल्या रेती व खडीच्या २ गाड्या महसूल विभागाने जप्त केल्या आहेत. राजू काळे याची रेतीची गाडी बनावट वाहतूक परवाना बनवून संपलेल्या रॉयल्टीवर चालवली जात होती. तर मालक इम्रान कुरेशी व चालक हरिशंकर यादव हे विनापरवाना खडी घेऊन चालले होते. या दोन्ही वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे सुद्धा पत्र देण्यात येणार आहे.

Web Title: Action against sand mafias at Ghodbunder, 54 brass sand stocks destroyed, 4 suction pumps seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.